Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघव यांच्या लग्नात होते अनेक चविष्ट पदार्थ; जाणून तुमच्याही तोंडाला येईल पाणी
Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघव यांच्या शाही विवाह सोहळ्यात पाहुण्यांसाठी होते अनेक चविष्ट पदार्थ... सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत... आता लग्नसोहळ्यातील मेजवानी सर्वांसमोर
मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा यांच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. २४ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात राघव आणि परिणीती यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं आहे. सध्या सर्वत्र राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लग्नात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले नाहीत. लग्नानंतर खुद्द परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला…
सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या शाही विवाहाची चर्चा रंगली आहे. अनेक महागड्या वस्तू आणि फुलांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं ठिकाण सजवण्यात आलं होतं. फोटोमध्ये देखील लग्नासाठी केलेल्या सजावटीची एक झलक दिसत आहे. अशात लग्नात जेवण काय होतं याची देखील चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या मेहेंदी फंक्शनमध्ये पाहुण्यांच्या दुपारी जेवणासाठी भारतीय, इटालियन आणि आशियाई पदार्थांचा समावेश होता. लग्नाच्या दिवशी, मेनूमध्ये पारंपारिक राजस्थानी जेवण तसेच पंजाबी खाद्यपदार्थांचा समावेश होता.
परिणीती चोप्राचे भाऊ सहज चोप्रा आणि शिवांग चोप्रा यांनी तिच्या लग्नाच्या फंक्शन्ससाठी मेनू तयार केला होता.. असं देखील सांगण्यात येत आहे. संगीत रात्रीच्या मेनूमध्ये क्लासिक स्ट्रीट फूड आणि रबडी, जलेबी, मॅगी आणि पाणीपुरी आणि मिठाईंचा समावेश होता. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लग्नातील मेन्यूची चर्चा रंगत आहे.
लग्नाचे फोटो पोस्ट करत परिणीती म्हणाली…
इंस्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत परिणीती चोप्रा हिने कॅप्शनमध्ये, ‘नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’ असं लिहिलं.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. या शाही लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. टेनिस स्टार सानिया मिर्झा, डिझायनर मनीष मल्होत्रा, क्रिकेटर हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र, तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रा या लग्नात सहभागी होऊ शकली नाही. ज्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या..