Parveen Babi: परवीन बाबी यांच्या मुंबईतील फ्लॅटला खरेदीदारच मिळेना!

मुंबईतील 'या' ठिकाणी राहायचं अनेकांचं स्वप्न; भाडेकरूही का देतात नकार?

Parveen Babi: परवीन बाबी यांच्या मुंबईतील फ्लॅटला खरेदीदारच मिळेना!
परवीन बाबीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 7:25 PM

अभिनेत्री परवीन बाबीची (Parveen Babi) एक झलक पाहण्यासाठी त्याकाळी लोक अक्षरश: वेडे व्हायचे. परवीन यांना मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत यश आणि प्रसिद्धी मिळाली. पण कॅमेऱ्याच्या या चकाकीमागे एक वेगळंच जग असतं. ज्याची ओळख परवीन यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतरही झाली. परवीन एकट्याच राहत होत्या. जेव्हा त्या मानसिक आजाराशी लढत होत्या तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यांच्या निधनानंतरही तीन दिवस कोणालाच काही कळलं नव्हतं.

ज्या फ्लॅटमध्ये परवीन यांचा मृत्यू झाला, तो फ्लॅट मुंबईतील अतिशय सुंदर ठिकाणी आहे. जुहूमध्ये समुद्राच्या किनाऱ्याजवळ हा फ्लॅट आहे. पण परवीन यांचा हा फ्लॅट विकत घेण्यास लोक कचरत आहेत. त्यांच्या फ्लॅटसाठी खरेदीदारच सापडत नाहीये. इतकंच नव्हे तर तो फ्लॅट कोणी भाड्यानेही घ्यायला तयार नाही.

परवीन बाबी यांचा मृतदेह ज्या फ्लॅटमध्ये सापडला, तो मुंबईतील जुहू भागातील रिव्हिएरा बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर आहे. ही इमारत प्रसिद्ध जुहू बीचवर आहे. हा टेरेस फ्लॅट आहे. “हा फ्लॅट केवळ विक्रीसाठी नाही तर भाड्यानेही उपलब्ध आहे. त्याची 15 कोटी रुपयांना विक्री होऊ शकते. जर एखाद्याला भाड्याने हे घर घ्यायचं असेल तर दरमहा 4 लाख रुपये भाडं द्यावं लागेल,” अशी माहिती ‘नवभारत टाइम्स’ने दिली.

हे सुद्धा वाचा

2014 मध्ये अग्रवाल हा भाडेकरू या फ्लॅटमध्ये राहत होता. परंतु फ्लॅटचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर तो अडचणीत आला. तो त्याच्या कुटुंबासह या फ्लॅटमध्ये राहत होता. मात्र त्याला ताबडतोब निघून जाण्यास सांगण्यात आलं.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.