Pathaan | प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या ‘पठाण’ने मोडला हृतिकच्या ‘वॉर’चा रेकॉर्ड; जबरदस्त ओपनिंगचा अंदाज

पहिल्या वीकेंडसाठी पठाणची ॲडव्हान्स बुकिंग जोरदार झाल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत पठाणने गेल्या वर्षातील सर्वांत मोठा बॉलिवूड चित्रपट 'ब्रह्मास्त्र'ला मागे टाकलं आहे.

Pathaan | प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या 'पठाण'ने मोडला हृतिकच्या 'वॉर'चा रेकॉर्ड; जबरदस्त ओपनिंगचा अंदाज
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 2:08 PM

मुंबई: तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट उद्या (25 जानेवारी) प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोणसुद्धा धमाकेदार ॲक्शन अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटावरून वाद सुरू असला तरी त्याची उत्सुकताही तेवढीच पहायला मिळतेय. पठाणची ही क्रेझ वाढत चालली असून ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे नुकतेच समोर आले आहेत.

पहिल्या वीकेंडसाठी पठाणची ॲडव्हान्स बुकिंग जोरदार झाल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत पठाणने गेल्या वर्षातील सर्वांत मोठा बॉलिवूड चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ला मागे टाकलं आहे. तर आता केजीएफ 2 ला शाहरुखच्या या चित्रपटाकडून आव्हान देण्यात येतंय.

पहिल्या वीकेंडसाठी झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगमधून पठाणची कमाई ही 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याचं समजतंय. बुधवारसाठी 24 कोटी रुपयांची तर गुरुवारसाठी 13.38 कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली आहेत. त्यापुढील दिवसांसाठी 13.92 कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवसासाठी ‘पठाण’ची 8 लाख तिकिटं ॲडव्हान्समध्ये विकली गेली आहेत. यापैकी 4.19 लाख तिकिटं ही PVR, INOX आणि Cinepolis या नॅशनल सिनेमा चेन्समध्ये विकली गेली आहेत. एखाद्या बॉलिवूड चित्रपटासाठी हा खूप मोठा आकडा आहे. याआधी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या चित्रपटाच्या नावावर हा विक्रम होता. वॉरची तब्बल 4.10 लाख तिकिटं विकली गेली होती.

पठाण हा ओपनिंग वीकेंडला ॲडव्हान्स कलेक्शनच्या बाबतीत सर्वांत मोठा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. 5 दिवसांच्या मोठ्या वीकेंडसाठी या चित्रपटाने आतापर्यंत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. याआधी हा विक्रम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ या चित्रपटाच्या नावे होता. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडसाठी जवळपास 42 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स ग्रॉस कलेक्शन केलं होतं.

‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही भूमिका आहेत. हा या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याचं दिसतंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.