तिसऱ्या दिवशी ‘पठान’च्या ‘वसुलीला’ ब्रेक; या सिनेमाचं रेकॉर्ड तोडण्याचं स्वप्न भंगलं
पठान सिनेमाचं स्वप्न भंगलं.... तिसऱ्या दिवशी 'पठान' सिनेमाचा वेग मंदावला ; अन्य सिनेमांपेक्षा शाहरुख खान याच्या सिनेमाची कमाई अत्यंत कमी, कोणत्या सिनेमांनी पठानला टाकलं मागे...
Pathaan Box Office Collection Day 3: अभिनेता शाहरुख खान स्टारर पठान सिनेमाने प्रदर्शनानंतर दोन दिवस बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. पण तिसऱ्या दिवशी मात्र सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरील वेग मंदावला आहे. रोज नवीन रेकॉर्ड करणाऱ्या पठान सिनेमा प्रदर्शनानंतर तिसऱ्या दिवशी फेल ठरला आहे. तिसऱ्या दिवशी पठान २०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला. पण अनेकांचा अंदाज मात्र फेल ठरला आहे. पठाण सिनेमाच्या तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे सांगितले आहेत.
पठान सिनेमाने तिसऱ्या दिवशी फक्त ३४ ते ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पठान सिनेमाचं तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन इतर सिनेमांच्या कलेक्शनच्या तुलनेत फार कमी आहे. तिसऱ्या दिवशी शाहरुख खान स्टारर पठान नवीन विक्रम रचेल असं सांगण्यात आलं. पण तसं काही झालं नाही. पठान सिनेमा तिसऱ्या दिवशी विक्रम रचून बाहुबली २, केजीएक २ आणि दंगल यांसारख्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज होता.
#Pathaan Day 3 All-India Early estimates is ₹ 34 to 36 Crs Nett..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 28, 2023
शुक्रवारी सुट्टी नसल्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठान सिनेमाचा बोलबाला कमी झाल्याचं चित्र समोर आलं. दुसऱ्या सिनेमांच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, संजू सिनेमाने प्रदर्शनानंतर तिसऱ्या दिवशी ४६.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. बाहुबली २ सिनेमाने ४६.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, केजीएक २ सिनेमाने ४२.९ कोटी रुपयांपर्यंत दिवशी मजल मारली आणि दंगल सिनेमाने ४१.३४ कोटी रुपयांची कमाई केली. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुट्टी होती.
रमेश बाला यांच्या ट्विटनुसार तिसऱ्या दिवशी पठाण सिनेमाने ३४ ते ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७०.५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली.
तिसऱ्या दिवशी भारतात बॉक्स ऑफिसवर पठानची गती मंदावली असली तरी, जगभरात मात्र शाहरुखच्या पठानची चर्चा आहे. ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांच्या ट्विटनुसार तीन दिवसात पठाण सिनेमाने जगभरात ३०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमाची दमदार कमाई सर्व रेकॉर्ड मोडताना दिसत आहे.