Pathaan | ‘पठाण’ने आठव्या दिवशी रचला इतिहास; शाहरुख खानच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

येत्या काही दिवसांत 'पठाण' हा बॉक्स ऑफिसवरील इतरही बरेच विक्रम मोडणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. याआधी आमिर खानचा 'दंगल' पहिल्या क्रमांकावर आणि प्रभासचा 'बाहुबली' दुसऱ्या क्रमांकावर विक्रम रचणारे चित्रपट ठरले होते.

Pathaan | 'पठाण'ने आठव्या दिवशी रचला इतिहास; शाहरुख खानच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 12:38 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठव्या दिवशीही जगभरात दमदार कमाई झाली. पहिल्या सात दिवसांत या चित्रपटाने जगभरात 634 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. फक्त भारतातील कमाईचा आकडा पाहिला तर गेल्या आठ दिवसांत ‘पठाण’ने तब्बल 349.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील आठव्या दिवसाचं कलेक्शन हे 665 कोटींवर पोहोचलं आहे. या कमाईसह पठाण हा देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे.

‘पठाण’ने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी जवळपास 18 ते 19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगद्वारेच 50 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. त्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने 57 कोटी रुपयांसह धमाकेदार ओपनिंग केली. गेल्या बऱ्याच वर्षांनंतर ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर जगभरात 1000 कोटी रुपयांचा आकडा पार करणारा चित्रपट ‘पठाण’ ठरू शकेल अशी अपेक्षा आहे.

येत्या काही दिवसांत ‘पठाण’ हा बॉक्स ऑफिसवरील इतरही बरेच विक्रम मोडणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. याआधी आमिर खानचा ‘दंगल’ पहिल्या क्रमांकावर आणि प्रभासचा ‘बाहुबली’ दुसऱ्या क्रमांकावर विक्रम रचणारे चित्रपट ठरले होते.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’ची आतापर्यंतची दिवसागणिक कमाई-

पहिल्या दिवशी- 57.05 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी- 70.05 कोटी रुपये तिसऱ्या दिवशी- 39.25 कोटी रुपये चौथ्या दिवशी- 51 कोटी रुपये पाचव्या दिवशी- 60.75 कोटी रुपये सहाव्या दिवशी- 25 कोटी रुपये सातव्या दिवशी 20 ते 22 कोटी रुपये आठव्या दिवशी- 18 ते 19 कोटी रुपये

2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तो दणक्यात आपटला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांसाठी हा जणू एखादा उत्सवच होता. म्हणूनच पहिल्याच दिवसापासून थिएटर्स हाऊसफुल झाले.

पठाण या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.