‘पठाण’ची सर्वत्र जादू, सिनेमासाठी डायलॉग लिहणाऱ्या व्यक्तीला नाही मिळालं याठिकाणी तिकीट
बॉक्स ऑफिसवर रोज नवीन विक्रम रचणाऱ्या पठाणा सिनेमाच्या लेखकाला का नाही मिळाले तिकीट; अद्यापही लेखकाने का नाही पाहिला सिनेमा? लेखकाने भावना केल्या व्यक्त
मुंबई : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ (Pathaan ) सिनेमाची क्रेझ फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील पाहायला मिळत आहे. सिनेमा रोज नव-नवीन विक्रम रचत आहे. सिनेमाने आतापर्यंत जगभरात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘पठाण’ सिनेमाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. पठाण सिनेमाचा प्रत्येक शो हाऊस फूल असल्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, अनेकांना सिनेमाचं तिकीट मिळणं देखील अवघड झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने सिनेमासाठी डायलॉग लिहिलं त्याच व्यक्तीला ‘पठाण’ सिनेमा सिनेमागृहात पाहण्यासाठी तिकीट मिळालेलं नाही. सिनेमाचे लेखक अब्बास टायरवाला (abbas tyrewala) यांना अद्याप सिनेमा पाहण्यासाठी तिकीट मिळालेलं नाही. (Pathaan box office collection)
एका मुलाखतीत अब्बास टायरवाला यांनी सिनेमाचं तिकीट मिळालं नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘मी अद्याप ‘पठाण’ सिनेमा पाहिलेला नाही. यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण मला सिनेमाचं तिकीट मिळालेलं नाही. २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात पठाण पाहण्यासाठी गेलो. पण मला पूर्ण दिवस तिकीट मिळालं नाही.’
अब्बास टायरवाला पुढे म्हणाले, ‘गोवा याठिकाणी एका लग्नासाठी आल्यामुळे मी पठाण पाहायला आलो. तिकीट मिळालं नसलं तरी आनंद आहे. कारण चाहत्यांमुळे सिनेमागृह हाऊस फूल होत आहेत. चाहत्यांना सिनेमा प्रचंड आवडत आहे.’ असं देखील लेखक म्हणाले. सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारत आहे.
भारत ‘पठाण’ सिनेमाने कमावले इतके कोटी
बुधवारी पठाण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सलग सातव्या दिवशी पठाण बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. पण सोमवार आणि मंगळवारी मात्र सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला. सिनेमाने मंगळवारी फक्त २१ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दुसऱ्या आठवड्यात सिनेमा ४०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला जमा करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.