Pathaan Trailer: देवसुद्धा याला वाचवू शकणार नाही; ट्रेलर पाहून या अभिनेत्याने ‘पठाण’ला म्हटलं फालतू!

Pathaan Trailer: 10 जानेवारी रोजी 'पठाण' या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र अशातच एका अभिनेत्याने या चित्रपटाला 'डिझास्टर' (Disaster) म्हटलंय.

Pathaan Trailer: देवसुद्धा याला वाचवू शकणार नाही; ट्रेलर पाहून या अभिनेत्याने 'पठाण'ला म्हटलं फालतू!
Pathaan Trailer: 'अब पठान के वनवास का टाइम खत्म', शाहरुख-दीपिकाच्या 'पठाण'चा ॲक्शन पॅक्ड ट्रेलर पाहिलात का?Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 9:40 AM

Shah Rukh Khan Pathaan Trailer: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ट्रेलरच्या प्रतीक्षेचा वनवास संपला आहे. 10 जानेवारी रोजी ‘पठाण’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींनीही या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. मात्र अशातच एका अभिनेत्याने या चित्रपटाला ‘डिझास्टर’ (Disaster) म्हटलंय.

थेट शाहरुखच्या ट्विटवर असं म्हणणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो ‘पठाण’बद्दल ट्विट केल्यामुळे चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला केआरके?

‘पठाणचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा धक्का बसला आणि मी फक्त एवढंच म्हणू शकतो की हे काय आहे? शाहरुख खान असा फालतू चित्रपट कसा करू शकतो? जॉन अब्राहमच्या अटॅक या चित्रपटाची कथासुद्धा अशीच होती आणि तोसुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला’, असं त्याने एका ट्विटमध्ये लिहिलंय.

चित्रपट दिग्दर्शक आनंद कुमार यांनी पठाणच्या ट्रेलरचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. त्यावरही प्रतिक्रिया देत केआरकेनं टीका केली. ‘भाई, देवसुद्धा या चित्रपटाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाही’, असं त्याने लिहिलं. इतक्यावरच न थांबता कमाल आर. खानने थेट शाहरुखच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. ‘भाईजान, शुभेच्छा! हा 100 टक्के फ्लॉप ठरणार आहे. आणखी एक चुकीची निवड. पुढच्या चित्रपटासाठी शुभेच्छा’, असं त्याने शाहरुखच्या ट्विटवर म्हटलंय.

केआरकेनं असं ट्विट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांवर टीका केली. विशेष म्हणजे पठाणचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर रितेश देशमुख, रामचरण, थलपती विजय, दुलकर सलमान, रॅपर बादशाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शाहरुखचं कौतुक केलं.

या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमने यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.