Pathaan: ‘बेशर्म रंग’च्या वादादरम्यान ‘पठाण’मधील दुसरं गाणं प्रदर्शित; शाहरुख-दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री

'झुमे जो पठान' म्हणत शाहरुखने जिंकली चाहत्यांची मनं; दीपिकासोबतचं नवीन गाणं पाहिलंत का?

Pathaan: 'बेशर्म रंग'च्या वादादरम्यान 'पठाण'मधील दुसरं गाणं प्रदर्शित; शाहरुख-दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री
'पठाण'मधील नवीन गाणं प्रदर्शितImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 12:16 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटातील नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील पहिल्या ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. त्यावरूनच या चित्रपटाला आणि गाण्याला विरोध केला गेला. आता या वादादरम्यान निर्मात्यांनी दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘झुमे जो पठान’ असं या गाण्याचं नाव आहे. अरिजित सिंगच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

अरिजितने याआधीही शाहरुखची अनेक गाणी आपल्या आवाजात गायली होती आणि ती सुपरहिट ठरली होती. आता झुमे जो पठान हे गाणंसुद्धा हिट होणार असा अंदाज व्यक्त होत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावरच हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या गाण्यात पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. विशाल-शेखर या जोडगोळीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. पठाण या चित्रपटासाठी शाहरुखने त्याच्या शरीरयष्टीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याची ही मेहनत पठाणमधील गाण्यांमध्ये स्पष्ट दिसून येतेय. ‘झुमे जो पठान’ या उडत्या चालीच्या गाण्यावर शाहरुख-दीपिकाने जबरदस्त ठेका धरला आहे.

पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख जवळपास चार वर्षांनंतर मुख्य भूमिकेत कमबॅक करतोय. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. आता पठाणकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. पठाणमध्ये शाहरुख, दीपिकासोबतच जॉन अब्राहमचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.