Pathaan | शाहरुख बनला बॉक्स ऑफिसचा ‘बादशाह’; ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पदार्पणाच्या दिवशीच या चित्रपटाने भारतात 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर परदेशातही त्याची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली.

Pathaan | शाहरुख बनला बॉक्स ऑफिसचा 'बादशाह'; 'पठाण'ने पहिल्याच दिवशी केली 100 कोटींची कमाई
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 4:44 PM

मुंबई: तब्बल चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खानने मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आणि त्याच्या कमबॅकच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई केली. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पदार्पणाच्या दिवशीच या चित्रपटाने भारतात 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर परदेशातही त्याची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली. पठाणने परदेशातही तेवढीच कमाई केल्याचं कळतंय. त्यामुळे जगभरातल्या कमाईचा आकडा पाहिला तर पहिल्याच दिवशी शाहरुखच्या ‘पठाण’ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

पठाणने पहिल्याच दिवशी जगभरात 100 ते 110 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाने 1.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. पठाणने हृतिक रोशनच्या ‘वॉर’, यशच्या ‘केजीएफ 2’ (हिंदी व्हर्जन) या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. वॉरने पहिल्या दिवशी 50 तर केजीएफ 2 ने 52 कोटी रुपयांची कमाई केली होती.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी लक्षात घेता ‘पठाण’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईतही चांगली वाढ पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’मुळे शाहरुखचं 32 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण

“मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे”, असं शाहरुखने म्हटलंय.

‘पठाण’साठी दीपिका पदुकोणची निवड का?

“या चित्रपटाला दीपिकाच्या तोडीच्या एका व्यक्तीची गरज होती. जी बेशर्म रंगसारखं गाणंही करू शकेल, जी ॲक्शन सीन्स पण करू शकेल. यातील एका दृश्यात ती एका मुलाशी भिडते. ती इतकी धाडसी आहे की ते हे सर्व करू शकते. असं अनोखं समीकरण फक्त दीपिकासोबतच मिळू शकतं. एका ॲक्शन फिल्मच्या हिरोइनच्या दृष्टीने तिच्या भूमिकेला अनेक छटा आहेत”, असं किंग खानने सांगितलं.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.