शूटिंगदरम्यान पवित्रा पुनियासोबत ‘वॉर्डरोब मालफंक्शन’; सांगितली घटना

बिग बॉस आणि अभिनेता एजाज खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री पवित्रा पुनियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वॉर्डरोब मालफंक्शनचा किस्सा सांगितला. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान पवित्राच्या ब्लाऊजचा हुक तुटला अन् पुढे जे काही झालं..

शूटिंगदरम्यान पवित्रा पुनियासोबत 'वॉर्डरोब मालफंक्शन'; सांगितली घटना
Pavitra PuniaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 1:43 PM

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम पवित्रा पुनिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एजाज खान आणि पवित्रा पुनिया एकमेकांच्या प्रेमात पडले. घरातून बाहेर पडल्यानंतर दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर एजाज आणि पवित्र यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पवित्रा तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आली आहे. ‘इश्क की दास्तां- नागमणी’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत ही घटना घडली. जंगलात एका सीनचं शूटिंग करताना पवित्रा पडली आणि तेव्हा तिच्या ब्लाऊजचा हुक तुटला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पवित्राने या घटनेविषयी सांगितलं. जंगलात धावत जाण्याचा तिचा सीन होता. यावेळी पवित्रासोबत ही धक्कादायक घटना घडली. ब्लाऊजचा हुक तुटल्यानंतर पवित्रा घाबरली होती. ब्लाऊजचा स्ट्रॅप खुलताच ती खाली पडली. कुठे काही दिसलं तर नाही ना, अशी भीती तिला होती. काही क्षणांसाठी मी सुन्न झाले होते, असं ती म्हणाली. कारण अशी घटना घडेल, याची कल्पनासुद्धा तिने केली नव्हती.

हे सुद्धा वाचा

“माझ्यासाठी तो असा क्षण होता, ज्याविषयी मी शब्दांत काही मांडू शकत नाही. पण ही घटना खूप भयानक होती. मालिकेतील माझ्या भूमिकेला साजेसा लूक मी केला होता. जो ब्लाऊज मी त्यादिवशी परिधान केला होता, त्याला एकाच हुकची स्ट्रॅप होती. शूटिंगदरम्यान माझं थोडंसं वजनसुद्धा वाढलं होतं. माझं अडीच किलो वजन वाढलं होतं”, असं तिने सांगितलं. याविषयी ती पुढे म्हणाली, “सुदैवाने हुक निघाल्यानंतर कॅमेरात काही दिसलं नाही. जवळच असलेल्या क्रू मेंबर्सनी माझी तातडीने मदत केली. हुक तुटताच कॅमेरा बंद करण्यासाठी सर्वजण ओरडू लागले होते. माझ्या टीमने माझी खूप साथ दिली.”

पवित्रा पुनियाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने नुकताच बॉयफ्रेंड एजाज खानशी ब्रेकअप केला. सध्या मी माझ्या कुटुंबीयांना अधिकाधिक वेळ देतेय आणि माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय, अशी प्रतिक्रिया तिने दिली. बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये एजाज आणि पवित्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.