साऊथ सुपरस्टार पवन कल्याणच्या एक्स वाइफने आरोग्याविषयी केला मोठा खुलासा

जे लोक त्यांच्या आयुष्यातील विविध समस्यांचा सामना करत आहेत, त्यांनीही हार न मानता मजबूत राहावं, असं तिने म्हटलंय. रेणूने मंगळवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्या शरीरावर हॉल्टर लावल्याचं पहायला मिळत आहे.

साऊथ सुपरस्टार पवन कल्याणच्या एक्स वाइफने आरोग्याविषयी केला मोठा खुलासा
Pawan KalyanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 3:10 PM

हैदराबाद: तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याणची पूर्वाश्रमीची पत्नी रेणू देसाईने तिच्या आरोग्याविषयी मोठा खुलासा केला आहे. हृदयरोग आणि आरोग्याशी संबंधित इतर आजारांचा सामना करत असल्याचं तिने लिहिलं. त्याचप्रमाणे रेणूने तिच्या या पोस्टमध्ये कठीण काळात खंबीर राहण्याविषयीही लिहिलं आहे. जे लोक त्यांच्या आयुष्यातील विविध समस्यांचा सामना करत आहेत, त्यांनीही हार न मानता मजबूत राहावं, असं तिने म्हटलंय. रेणूने मंगळवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्या शरीरावर हॉल्टर लावल्याचं पहायला मिळत आहे.

रेणूने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींना ही गोष्ट माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून मी हृदय आणि स्वास्थ्याशी संबंधित अन्य समस्यांचा सामना करतेय. कधीकधी हे समजणं खूप कठीण असतं की आपल्यासोबत नेमकं काय घडतंय? मी ही पोस्ट यासाठी शेअर करतेय कारण मी स्वत:ला आणि विविध समस्यांचा सामना करणाऱ्यांना हे सांगू इच्छिते की आपल्याला खंबीर राहावं लागेल. आपल्यासोबत जे काही घडतंय त्यावर विश्वास ठेवावा लागेल. आयुष्यावरील आणि स्वत:वरील आशा सोडू नका. या विश्वाकडे आपल्यासाठी खूप चांगला प्लॅन्स आहेत.’

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by renu desai (@renuudesai)

आरोग्याशी संबंधित या समस्यांवर उपचार सुरू असून योगसाधनाही करत असल्याचं तिने स्पष्ट केलं. त्याचसोबत खाण्यापिण्याच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवत असल्याचं रेणूने सांगितलं. लवकरच बरी होऊन शूटिंगला सुरुवात करणार असल्याचा विश्वास तिने या पोस्टमध्ये व्यक्त केला.

रेणू देसाईने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रेणू आणि पवन कल्याण यांचं लग्न 2009 मध्ये पार पडलं होतं. मात्र लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. रेणूने ब्रदी, जेम्स पंडू आणि जॉनी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. जवळपास 18 वर्षांनंतर ती रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे.

पवन कल्याणने 16 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा लग्न केलं. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव नंदिनी होतं. 1997 मध्ये त्याने नंदिनीशी लग्न केलं होतं. मात्र 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर पवनच्या आयुष्यात रेणू देसाई आली. पवन आणि रेणू यांचाही संसार फार काळ टिकला नाही. पवनला रेणूपासून अकिरा आणि आध्या अशी दोन मुलं आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.