‘इरफान पठाणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना गौतम गंभीर सतत…’, बॉलिवूड अभिनेत्री धक्कादायक दावा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इरफान पठाणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना गौतम गंभीर नक्की करायचा तरी काय? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत केलं चाहत्यांचं मनोरंजन

'इरफान पठाणसोबत रिलेशनशिपमध्ये असताना गौतम गंभीर सतत...', बॉलिवूड अभिनेत्री धक्कादायक दावा
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 10:35 AM

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वाचं नातं अत्यंत घट्ट आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसोबत लग्न केलं. काहींचे एकमेकांसोबत प्रेम संबंध देखील होते. पण त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रिकेटपटूंबद्दल मोठा दावा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पायल घोष आहे. पायल घोष कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री लक्षवेधी वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इरफान पठाणला पाच वर्षांपासून डेट करत असल्याचा दावा करण्यापासून ते मोहम्मद शमीशी लग्न करण्याची आणि त्याची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत पायलने तिच्या विधानांमुळे चर्चेत आली आहे.

दरम्यान, पायल घोष हिने आणखी एक धक्कादायक दावा करून सर्वांना हैराण केलं आहे. पायल घोष हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठा दावा केला आहे. जेव्हा पायल आणि इरफान पठाण एकमेकांना डेट करत होते, तेव्हा नक्की काय घडलं होतं. याचा खुलासा अभिनेत्रीने केला. एवढंच नाही तर, पायल हिने गौतम गंभीर याच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.

पायल म्हणाली, ‘गौतम गंभीर रोज मला मिसकॉल द्यायचा. ही गोष्ट इरफान पठाण याला देखील चांगल्या प्रकारे माहिती होती. तो माझा फोन तपासून पाहायचा. ही गोष्ट इरफान याने माझ्यासमोर यूसुफ भाई, हार्दिक आणि क्रुणाल पंड्या सांगितली होती. त्यावेळी बडोद्यात एक सामना होता…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पायल घोष हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या पोस्टमध्ये इरफान पठाण याच्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘आमचं ब्रेकअप झाल्यानंतर मी प्रचंड आजारी पडली होती. कित्येक वर्ष मी काम देखील करु शकली नाही. तो एकच मुलगा होता, ज्याच्यावर मी अफाट प्रेम केलं. त्यानंतर मी कधीच कोणावर प्रेम केलं नाही..’ असं देखी पायल म्हणाली. पायम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

नोव्हेंबर 2023 मध्ये, वर्ल्ड कप 2023 फायनल दरम्यान, पायल घोष हिने ट्विटरवर एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘मोहम्मद शमीशी लग्न करायला तयार आहे, पण त्याने स्वतःची इंग्रजी सुधारायला हवी…’ असं म्हणत अभिनेत्रीने मोहम्मद शमीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पायल तिच्या कामामुळे कमी तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते.

पायल हिने अनेक सिनेमे, वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक मालिकांमध्ये देखील पायल झळकली. सोशल मीडियावर देखील पायल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.