अगोदर मारली लाथ, आता थेट चप्पलने केली अंकिता लोखंडे हिने पती विकी जैनची धुलाई, व्हिडीओ व्हायरल
अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये घरात मोठे वाद होताना दिसले. फक्त हेच नाही तर भांडणामध्ये अंकिता लोखंडे हिने पती विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले, ज्यानंतर सर्वजण हैराण झाले.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याला थेट चप्पलने मारताना दिसतंय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होताना दिसत आहेत. विकी जैन हा खानजादी हिच्याबद्दल बोलताना दिसतोय. खानजादी ही दुसऱ्यांच्या रूममधील जेवण खात असल्याचे विकी जैन हा म्हणताना दिसतो. तिथे काही वेळामध्येच अंकिता लोखंडे ही पोहचते. यावेळी अगोदर अंकिता लोखंडे ही विकी जैन याला शांत बसण्यास सांगताना दिसत आहे. मात्र, विकी जैन हा अंकिता लोखंडे हिचे काहीच ऐकत नाही.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये भांडणे सुरू होतात. दोघेही मजाकमध्ये ऐकमेकांना मारताना दिसत आहेत. इतकेच नाही विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला मारून दूर पळताना दिसतोय. मग काय अंकिता लोखंडे हिचा पारा चांगलाच चढतो आणि मग ती थेट आपल्या पायातील चप्पल काढून विकी जैन याला मारताना दिसते.
अंकिता लोखंडे ही पहिल्यांदा एक चप्पल काढून विकी जैन याला मारताना दिसत आहे. त्यानंतर दुसरीही चप्पल अंकिता लोखंडे ही पायामधून काढून मारते. मात्र, कुठेतरी अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे मजाकमध्ये करताना दिसत आहेत. मात्र, यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
Mujhe yeh vali fight dekhni hain Serious vali nahi
bolna mat chappal maari 😂 Kyuki yeh bohot Masti vala tha jaise bestfriends ek dooshre ko maarte hain
Ek gala daba raha ek chapal 😂😂🤣
Ankita is in muanku mood#ankitalokhande #vickyjain #biggboss17 #munawarfaruqui pic.twitter.com/zbtRESokWN
— Ankitalokhande (fan) (@Ankitafam) November 19, 2023
अंकिता लोखंडे ही पतीला चप्पलने मारत असल्याचे काही लोकांना अजिबात आवडले नसल्याचे दिसतंय. अंकिता लोखंडे हिला खडेबोल सुनावत एकाने लिहिले की, हा काय प्रकार आहे, आपल्या पतीला चप्पलने मारते ही अंकिता लोखंडे. दुसऱ्याने लिहिले की, मागच्यावेळी भांडणामध्ये अंकिता लोखंडे हिने विकी जैन याला लाथ घातली होती आणि आता थेट चप्पल
तिसऱ्याने लिहिले की, अशाप्रकारे कोण नॅशनल टीव्हीवर आपल्या पतीला चप्पलने मारते यार. आता सोशल मीडियावर अंकिता लोखंडे आणि विकी यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये यापूर्वीही बिग बाॅसच्या घरात कडाक्याची भांडणे होताना दिसले आहे. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने काही गंभीर आरोपही विकी जैन याच्यावर केले आहेत.