बिग बॉसच्या घरात सापाचा मुक्त संचार; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, हैराण करणारा ‘तो’ व्हिडीओ पाहा…

Bigg Boss Ott 3 : बिग बॉस ओटीटी 3 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी हे चांगलेच चर्चेत दिसत आहे. आता नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार हा पुढे आलाय. या प्रकारानंतर लोक बिग बॉसच्या निर्मात्यांवर जोरदार टीका करताना देखील दिसत आहेत. अरमान मलिक याने विशाल पांडे याच्या कानाखाली नुकताच मारलीये.

बिग बॉसच्या घरात सापाचा मुक्त संचार; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, हैराण करणारा 'तो' व्हिडीओ पाहा...
Bigg biss ott
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 2:44 PM

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच रंगात आले असून बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये नुकताच अरमान मलिक याने विशाल पांडे याच्या कानाखील जाळ काढला. हेच नाहीतर अनिल कपूर हे देखील विशालला म्हणतात की, जर तू चुकीचे बोलत नव्हता तर तू कटारियाच्या कानामध्ये का बोलला? नुकताच घरात एक टास्क झालाय. यावेळी कटारिया याला घरातील सदस्यांनी शिक्षा सुनावली आहे. यानुसार कटारिया याला गार्डन परिसरातच झोपायचे आहे. हेच नाहीतर त्याचे हातही बांधले आहेत.

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटी 3 च्या LIVE फुटेजचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसलाय. फुटेजमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, स्विमिंग पूलजवळ गार्डन परिसरात एक साप रेंगताना दिसत आहे. यापेक्षाही हैराण करणारे म्हणजे टास्कनंतर शिक्षा मिळाल्याने तिथेच लवकेश कटारिया हा बसलाय.

लवकेशच्या मागून तो साप जात आहे. मात्र, तो साप लवकेश याला दिसत नाही. कारण त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला आहे. जर चुकून तो साप लवकेश याच्याजवळ आला असता तर तो पळूनही जाऊ शकला नसता. कारण त्यावेळी लवकेश कटारिया याचे हातही बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून लोक चांगलेच निर्मात्यांवर भडकल्याचे बघायला मिळतंय.

कारण तो विषारी साप लवकेश कटारिया या चावला असता. बिग बॉसच्या गार्डन परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर जियो सिनेमाच्या टीमच्या मेंबरने म्हटले आहे की, व्हिडीओसोबत छेडछाड करण्यात आलीये. परंतू, मुळात म्हणजे व्हिडीओ LIVE फुटेजचा आहे. ज्यानंतर निर्मात्यांनी मोठी पोलखोल झाल्याचे बघायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे साप दिसत आहे.

या प्रकारानंतर बिग बॉस ओटीटी 3 च्या निर्मात्यांनी साप घरात असल्याच्या दाव्याला नकार दिलाय. मात्र, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साप दिसल्यानंतर गार्डन परिसर हा रिकामा करण्यात आलाय. आता यासर्व हैराण करणाऱ्या प्रकारानंतर लोक जोरदार टीका निर्मात्यांवर करताना दिसत आहेत. या अगोदरही बिग बॉसच्या गार्डन परिसरात माकडे आणि वेगवेगळे पक्षी आल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे.  मात्र, बिग बॉसच्या घरात साप पाहून सर्वचजण हैराण झाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.