काय फालतूगिरी आहे, पूनम पांडे हिच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकरी भडकले
अभिनेत्री पूनम पांडे हिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या निधनाबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली. यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार नेमके कुठे होणार यावर चर्चा सुरू झाली. आता मोठा खुलासा एक व्हिडीओतून करण्यात आलाय.
मुंबई : माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. हैराण करणारे आणि धक्कादायक म्हणजे ही पोस्ट चक्क पूनम पांडे हिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनच शेअर करण्यात आली. ही पोस्ट तिच्या मॅनेजरकडून प्रसिद्ध करण्यात आली. हेच नाही तर पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार नेमके कुठे केले जाणार हे देखील सातत्याने विचारले जात होते. मात्र, नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यानंतर लोकांना मोठा धक्का बसलाय.
स्वत: पूनम पांडे हिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेच नाही तर चक्क या व्हिडीओमध्ये पूनम पांडे ही जीवंत असल्याचे सांगत आहे. पूनम पांडे हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांचा संताप हा चांगलाच वाढलाय. काल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिला श्रध्दाजंली वाहिली होती.
आता पूनम पांडे हिचा नेटकरी हे चांगलेच समाचार घेताना दिसत आहेत. लोकांनी कमेंट करत पूनम पांडे हिला चांगलेच खडसावले आहे. हेच नाही तर अनेकांनी थेट म्हटले की, काय फालतूगिरी आहे…हेच नाही तर व्हिडीओमध्ये पूनम पांडे ही सांगत आहे की, गर्भाशयातील कॅन्सर हा रोखला जाऊ शकतो.
View this post on Instagram
पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरनेच झाल्याचे सांगितले जात होते. अनेकांनी थेट अगोदरच सांगितले होते की, ही पूनम पांडे स्टंट करत असावी. मुळात म्हणजे अगोदर सांगितले गेले की, पूनम पांडे हिचे निधन मुंबईमध्ये झाले. नंतर सांगितले गेले की, पूनम पांडे हिचे निधन कानपूरमध्ये तिच्या राहत्या घरीच झाले.
पूनम पांडे हिच्या अंत्यसंस्काराबद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट येत नव्हते. त्यावेळीच अनेकांनी शंका व्यक्त केली होती. कंगना राणावतने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. पूनम पांडे हिच्यावर लोक सडकून टीका करताना दिसत आहेत. लोकांना पूनम पांडे हिचा हा मजाक अजिबातच आवडलेला दिसत नाहीये.