Dharmendra | लोक धर्मेंद्र यांना स्त्रीलंपट म्हणू लागले होते, पहिल्या पत्नीने सडेतोड उत्तर देत सावरली पतीची बाजू…

हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यामुळे धर्मेंद्र यांना स्त्रीलंपट म्हणू लागले होते लोक; अखेर पहिल्या पत्नीने अशा प्रकारे सावरली पतीची बाजू... अनेक वर्षांनंतर देखील हेमा आणि धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Dharmendra | लोक धर्मेंद्र यांना स्त्रीलंपट म्हणू लागले होते, पहिल्या पत्नीने सडेतोड उत्तर देत सावरली पतीची बाजू...
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 2:47 PM

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज अनेकांना माहिती आहे. धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील असताना देखील त्यांनी १९८० साली पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजपर्यंत हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढू शकल्या नाहीत. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर घेत दुसरा संसार थाटला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहे. ईशा आणि अहाना अशी त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबाची चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं, तेव्हा लोक धर्मेंद्र यांनी स्त्रीलंपट म्हणू लागले होते.

अशात धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी सडेतोड उत्तर देत पतीची बाजू सावरली. प्रकाश कौर म्हणाल्या, ‘धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेली भावना कमी झालेली नाही. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकजण स्त्रीलंपट म्हणू लागले होते. कोणी माझ्या पतीला असं का म्हणू शकतं? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी असंच केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि ते दुसरं लग्न करत आहेत…’ असं म्हणत प्रकाश कौर यांनी पतीची बाजू मांडली..

एवढंच नाही तर, एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. प्रकाश कैर म्हणाल्या होत्या की, ‘हेमा मालिनी यांची बाजू देखील मी समजू शकते. त्या देखील एक स्त्री आहेत. नातेवाईकांसमोर त्यांना देखील उभं राहवं लागत असेल. हेमा कोणत्या परिस्थितीत असतील ही गोष्ट मी समजू शकतो.’

हे सुद्धा वाचा

पुढे प्रकाश कौर म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी मी हेमा यांच्या जागी असती असं कधीही केलं नसतं.. मी त्यांना समजू शकते. त्या देखील एक आई आहेत… पण मी धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याला कधीही परवानगी देणार नाही..’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या…’

दरम्यान, अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याच्या लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगत आहे. करण याच्या लग्नात देओल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित होता. पण धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब लग्नात दिसलं नाही. अखरे धर्मेंद्र यांनी लग्नानंतर सोशल मीडिया पोस्ट करत दुसऱ्या कुटुंबावर असलेलं प्रेम व्यक्त केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.