सूरज चव्हाण याच्यामुळे होणार बिग बॉसच्या घरातील ‘या’ सदस्यावर मोठा अन्याय?, लोकांमध्ये संताप, थेट…
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. आता अवघ्या काही दिवसांमध्यचे बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले होईल. विशेष म्हणजे फिनाले वीकमध्येही घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात जोरदार हंगामा बघायला मिळाला. विशेष म्हणजे या सीजनबद्दल सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. हे सीजन धमाका करताना दिसले. मात्र, बिग बॉसच्या निर्मात्यांनी सर्वांना धक्का देत थेट हे सीजन 70 दिवसांमध्येच संपणार असल्याचे थेट जाहीर केले. यानंतर घरातील स्पर्धेक देखील हैराण झाले. बिग बॉस 18 साठी निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. वर्षा उसगावंकर या चांगलाच गेम घरात खेळताना दिसल्या. हेच नाही तर अनेकांना वर्षा उसगांवकर याच बिग बॉस मराठी सीजन 5 च्या विजेत्या होणार असल्याचे वाटत होते. मात्र, त्यांचा आता बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचे बघायला मिळतंय.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निकी तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे बिग बॉसचे टॉप 6 फायनलिस्ट बनले आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे दोघे बिग बॉसमध्ये टॉप 2 मध्ये पोहोचतील. कारण सूरज चव्हाणला लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच चांगला गेम खेळताना अभिजीत सावंत दिसतोय. एकीकडे सूरज चव्हाणला बिग बॉसचा विजेता करण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. सूरजची घरची परिस्थिती व्यवस्थित नाही आणि त्याला राहण्यासाठी साधे घर नसल्याने त्यालाच विजेता करा असे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय तो सर्वात प्रामाणिक सदस्य असल्याचा दावा देखील केला जातोय.
सूरज चव्हाण याची परिस्थिती पाहून लोक अभिजीत सावंत याच्यावर अन्याय करत असल्याने थेट त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. सूरज गरीब आहे तो प्रामाणिक आहे हे सर्व मान्य आहे पण या गोष्टींमुळे बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच धमाकेदार गेम खेळणाऱ्या अभिजीत सावंत याच्यावर अन्याय करू नका असे थेट त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे असा एक अंदाजा लावला जातोय की, सूरज चव्हाण याला अभिजीत सावंत याच्यापेक्षा जास्त मत मिळतील आणि तोच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होईल. मात्र, तो अभिजीत सावंत याच्यावर अन्याय असेल. बिग बॉसच्या घरात अजून धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि निकी तांबोळी हे देखील स्पर्धेक आहेत.