होळीनंतर मोठा… सलमानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्या आरोपींनी घरी काय सांगितलं?; इरादा काय होता?
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वजण चांगलेच हैराण झाले. हेच नाही तर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळाले. आता पोलिसांनी या हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे देखील कळत आहे.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सर्वजण हैराण झाले. हेच नाही तर या गोळीबाराचे काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसले. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घेतली. या गोळीबारानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरूवात देखील केली.
मुंबई पोलिसांनी गुजरातच्या भुजमधून ह्ल्लेखोरांना ताब्यात देखील घेतले. हे हल्लेखोर बिहारमधील असून हे काही दिवसांपासून मुंबई येथे राहण्यासाठी आले. हेच नाही तर या हल्लेखोरांनी पनवेलमध्ये एक फ्लॅट देखील किरायाने घेतला. नवीन दुचाकीही पनवेलमध्येच खरेदी केली. गेल्या काही दिवसांपासून या गोळीबाराचे प्लॅनिंग हे सुरू असल्याचे देखील सांगितले गेले.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हे हल्लेखोर बिहारच्या पश्चिम चंपारणच्या मसही गावचे रहिवासी आहेत. हेच नाही तर या गोळीबाराबद्दल त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नसल्याची देखील माहिती पुढे येतंय. मुंबईला कामासाठी जात असल्याचे सांगून हे हल्लेखोर मुंबईमध्ये आले. होळी झाल्यानंतर चार दिवसांनी हे हल्लेखोर मुंबईत दाखल झाले.
या दोन्ही हल्लेखोरांचे नाव विक्की साहब गुप्ता आणि जोगेंद्र पाल असल्याचे सांगितले जातंय. या गोळीबाराबद्दल यांचे घरचे काहीच बोलत नसून मुंबईला कामाला जात असल्याचे सांगून विक्की आणि जोगेंद्र निघाल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गॅंगचे सदस्य असल्याचे देखील सांगितले जातंय. यांच्या घरच्यांची देखील चाैकशी केली जात असल्याचे सांगितले जातंय.
विक्की गुप्ताची आई सुनीता देवी यांनी सांगितले की, कामासाठी हे दोघे मुंबईला गेले होते. तिथे जाऊन हे काय करत होते, याबद्दल काहीही माहिती नाही. आता नुकताच विक्की साहब गुप्ता आणि जोगेंद्र पाल यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याचे कळत आहे. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे होऊ शकतात. आरोपींची पोलिस कसून चाैकशी करणार असल्याचे स्पष्ट आहे.