‘फिर हेरा फेरी’मधली चिमुकली आठवतेय? 17 वर्षांनंतर तिला ओळखणंही कठीण

'फिर हेरा फेरी' या चित्रपटात बाबू भैय्याकडे खायला काहीतरी मागणारी आणि त्याने केळं खायला दिल्यावर काही सेकंदांत ती ते संपवणारी चिमुकली आठवतेय का? ही चिमुकली आता 26 वर्षांची झाली आहे. अँजेलिना इदनानी असं तिचं नाव आहे.

'फिर हेरा फेरी'मधली चिमुकली आठवतेय? 17 वर्षांनंतर तिला ओळखणंही कठीण
अँजेलिना इदनानीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 2:33 PM

मुंबई : 21 मार्च 2024 | अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाचा सीक्वेल ‘फिर हेरा फेरी’सुद्धा सुपरहिट ठरला. यामध्ये बिपाशा बासूच्या भाचीची भूमिका एका छोट्या मुलीने साकारली होती. ही छोटी मुलगी आता मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. या मुलीचं नाव अँजेलिना इदनानी आहे. अँजेलिना आता पूर्णपणे बदलली असून ती सध्या दुबईत राहतेय. तिचे आताचे काही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. या फोटोंमध्ये अँजेलिनाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये विशेष छाप सोडली. त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र हे बालकलाकार मोठे झाल्यानंतर काय करतात आणि कुठे आहेत हे कोणालाच फारसं माहीत नसतं. अनेकांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंडस्ट्री सोडली. तर काहींनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. अशीच एक बालकलाकार म्हणजे अँजेलिना इदनानी.

हे सुद्धा वाचा

अँजेलिना इदनानी ही ‘हेरा फेरी’ या चित्रपटात अत्यंत निरागस दिसली होती. तिचा निरागस चेहरा पाहूनच तिला चित्रपटातील भूमिकेची ऑफर मिळाली होती. ‘हेरा फेरी’नंतर तिने सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ता रा रम पम’ याचित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सैफ आणि राणीच्या मुलीच्या भूमिकेत होती. मात्र मोठी झाल्यानंतर अँजेलिना चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. ती दुबईला स्थायिक झाली आणि सध्या ती तिथेच शिक्षण पूर्ण करतेय.

अँजेलिना सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. इन्स्टाग्रामवरील तिचा अकाऊंट प्रायव्हेट असल्याने तिचे नवीन फोटो चाहत्यांना पहायला मिळत नाहीत. मात्र अँजेलिनाच्या फॅन पेजेसवर तिचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. आता ती 26 वर्षांची झाली असून तिचा लूक या फोटोंमध्ये पहायला मिळतोय. दुबईला स्थायिक झाल्यानंतर अँजेलिना चित्रपटांपासून दूर गेली. मात्र फॅशन सेन्सच्या बाबतीत ती अभिनेत्रींनाही टक्कर देते. अँजेलिनाने फॅशन मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. तिचा फॅशन सेन्स सर्वांत हटके असल्याचं दिसून येतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.