बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हृतिक रोशन याचे फक्त चित्रपट नाही तर त्याचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले आहे. हृतिक रोशन हा सबा आझाद हिला काही वर्षांपासून डेट करतोय. मात्र, सतत यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आता रंगत आहेत. सबा आझाद हिने थेट एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मोठ्या अभिनेत्याला डेट करत असल्याने मला काम मिळत नाहीये. लोकांना वाटते की, मोठ्या अभिनेत्याला डेट करत आहे तर मग हिला पैशांची काय गरज आहे. सबा आझाद हिच्या मुलाखतीनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
हेच नाही तर नेहमीच हृतिक रोशन आणि सबा आझाद हे कोणतीही पार्टी असो किंवा पुरस्कार सोहळा अशा ठिकाणी एकत्र येत. मात्र, ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून हे दोघे पार्ट्यांमध्येही एकत्र दिसत नाहीत. आता हृतिक रोशन याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये हृतिक रोशन हा एक्स पत्नी सुझैन खान हिच्यासोबत दिसतोय. यावेळी हृतिक रोशन आणि सुझैन यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत दिसतोय. सबा आझाद हिच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून हृतिक रोशन हा सुझैन खान हिच्यासोबत अधिक वेळ घालवताना दिसतोय.
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये सुझैन खान, हृतिक आणि त्यांचा मुलगा दिसतोय. विशेष म्हणजे हृतिक रोशन याचा मुलगा सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बाप लेक एकसारखेच दिसत असल्याचे थेट अनेकांनी म्हटले आहे. लोकांना हे फोटो आवडत आहेत. मात्र, एक्स पत्नीसोबत हृतिक रोशन फिरत असल्याचे अनेकांना पटले नाही.
हृतिक रोशन आणि सबा आझाद हे लग्न करणार असल्याची तूफान चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगताना दिसली. हृतिक रोशन याने लग्नानंतर सबा हिच्यासोबत राहण्यासाठी खास घर बांद्रामध्ये खरेदी देखील केले. मात्र, आता अचानकच यांच्या ब्रेकअपची चर्चा ही सुरू झाली. यामुळे हृतिक रोशन यांच्या आयुष्या नेमके काय सुरू आहे हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.