मुंबई: लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या आवाजाने मराठी मनावर गारूड निर्माण केलं आहे. त्यांच्या आवाजावर अख्खा महाराष्ट्र ठेका धरत असतो. पण त्यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांना आनंद शिंदे यांचा आवाज आवडत नव्हता. हे जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. त्याचाच हा किस्सा… (playback singer anand shinde’s story)
प्रल्हाद शिंदेंना कुणाचा आवाज आवडायचा?
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे या जोडगोळीने तुफान लोकप्रियता मिळवली होती. त्यातही आनंद शिंदेचा चाहता वर्ग मोठा होता. असं असलं तरी आनंद यांच्यापेक्षा प्रल्हाद शिंदेना मिलिंद यांचाच आवाज आवडायचा. वडिलांना माझा आवाज कधीच आवडला नाही. त्यांना मिलिंदचाच आवाज आवडायचा. मलाही मिलिंदचाच आवाज आवडतो. मिलिंदचा आवाज म्हणजे वडिलांचाच जिवंत आवाज आहे, असं आनंद शिंदे सांगतात. मिलिंदने रियाजाचं सातत्य ठेवलं तर ते सर्वांच्या पुढे जातील. गायन क्षेत्रात तो खूप काही करू शकतो, एवढी त्याच्या आवाजाची ताकद आहे, असं आनंद सांगतात.
रिक्षाही चालवली
वडिल महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक होते. पण या क्षेत्रात पैसा फारसा मिळत नसायचा. त्यामुळे वडिलांना आमच्या भविष्याची नेहमीच चिंता असायची. वडील म्हणायचे गाण्यात काही खरं नाही. गाणी गाणं हे खायाचं काम नाही. नोकरी कर. कामधंदा कर, असं वडील नेहमी म्हणायचे. त्यामुळे मी तबला वाजवायला शिकलो. त्यानंतर पुण्यात एका भावाकडे गेलो. तिथे राहत असताना रिक्षा चालवायला शिकलो. पण माझ्याकडून एक छोटासा अपघात झाला अन् रिक्षा चालवणं बंद केलं, असं आनंद शिंदे सांगतात.
पोपटवाल्याचा बाप
वडिलांना सुरुवातीला आम्ही गाणं गाणं पसंत नव्हतं. त्यांना वाटायचं आम्ही नोकरी करावी. कामधंदा करावा. गायन क्षेत्रात पैसा नसल्याने आमची हालाखीची स्थिती होऊ नये असं त्यांना वाटायचं. पण आमची जवा नवीन पोपट हा ही कॅसेट बाजारात आली आणि तुफान गाजली. त्यामुळे आम्ही स्थिरस्थावर झालो. नंतर नंतर तर वडिलांना कुणी विचारलं तर अरे त्या पोपटवाल्याचा बाप आहे मी असं ते अभिमानाने सांगायचे, असं सांगताना आनंद यांचे डोळे भरून येतात.
वडील फकिर, गरजवंताला मदत करायचे
आमचे वडील एकदम फकिर माणूस होते. त्यांच्या खिशात पैसा कधीच टिकला नाही. कुणी गरजवंत भेटला आणि त्यांना तो खरोखरच गरजू आहे असं वाटलं तर खिशात असतील नसतील तेवढे पैसे काढून द्यायचे. लोकांना ते नेहमी मदत करायचे. त्यांना मिळालेला पैसा घरापर्यंत येत नसायचा. त्यामुळे आला महिना कसाबसा ढकलावा लागायचा, असं आनंद सांगतात.
झाडू खात्यात कामाला लागायची हौस
त्यावेळी मी गायक होईल असं वाटलं नव्हतं. माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे त्यावेळी मुंबई महापालिकेत झाडू खात्यात कामाला होते. त्यामुले मलाही झाडू खात्यात कामाला लागवं असं वाटायचं. पोलिकेची नोकरी मला भारी वाटायची. पण आयुष्याला टर्न मिळत गेला आणि इथपर्यंत पोहोचलो, असं ते सांगतात. (playback singer anand shinde’s story)
संबंधित बातम्या:
आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?
आनंद शिंदे राजकारणात आले, राजकीय पक्षही स्थापन केला; तुम्हाला माहीत आहे का?
(playback singer anand shinde’s story)