मोदींची पोस्ट वाचताच आर्या आंबेकरच्या डोळ्यात तरळले अश्रू; सोशल मीडियावर पोस्टची चर्चा

आर्या आंबेकर आणि सुरेश वाडकर यांच्या सुमधूर आवाजातील 'हृदय में श्रीराम है' हे भक्तीगीत नुकतंच प्रदर्शित झालं. हे गीत अनेकांना भावलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर आर्या आणि सुरेश वाडकर यांचा उल्लेख करत ही खास पोस्ट लिहिली आहे.

मोदींची पोस्ट वाचताच आर्या आंबेकरच्या डोळ्यात तरळले अश्रू; सोशल मीडियावर पोस्टची चर्चा
Aarya AmbekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 10:47 AM

मुंबई : 20 जानेवारी 2024 | गायिका आर्या आंबेकरच्या एका व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळतेय. या व्हिडीओमध्ये आर्या आणि सुरेश वाडकर भजन गाताना दिसतायत. ‘हृदय में श्रीराम है’ असं या भजनाचं नाव असून आर्या आणि सुरेश वाडकर रामभक्तीत लीन झाल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर या भजनाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आर्या आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे राम भक्तीगीत आवडलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर या भक्तीगीताविषयी खास पोस्ट लिहिली आहे. गाण्याची लिंक शेअर करत मोदींनी आर्या आणि सुरेश वाडकर यांचं कौतुक केलं आहे.

‘अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश प्रभू श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी त्यांच्या सुमधूर सूरांद्वारे हीच भावना व्यक्त केली आहे,’ अशी पोस्ट मोदींनी लिहिली आहे. मोदींच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकजण आर्या आंबेकरविषयी सर्च करू लागले आहेत. आर्यानेही तिच्या सोशल मीडियावर मोदींची पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ‘आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्यापर्यंत पोहोचला, अशी भावना मनात निर्माण झाली,’ अशा शब्दांत आर्या व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

आर्या आंबेकर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कामाची प्रशंसक आहे. त्यामुळे थेट त्यांच्याकडूनच कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर तिचे डोळे पाणावले. इतका आनंद मी याआधी कधीच अनुभवला नव्हता. मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाहीये, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आर्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या भक्तीगीताचीही प्रशंसा केली आहे.

आर्याने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. आर्याची आई गायिका असून त्यांच्याकडून तिला गायनाचे धडे मिळाले आहेत. आर्याची आजीसुद्धा शास्त्रीय गायिका आहे. अगदी लहान वयातच आर्याने तिच्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्स, चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या एक अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांसमोर आली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.