“मला वाटलं तैमुर, जहांगीरला..”; मोदींनी सैफला प्रश्न विचारताच करीनाने मागितली ही गोष्ट

कपूर कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मोदींना सैफला त्याच्या दोन्ही मुलांबद्दल प्रश्न विचारला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने याचा खुलासा केला.

मला वाटलं तैमुर, जहांगीरला..; मोदींनी सैफला प्रश्न विचारताच करीनाने मागितली ही गोष्ट
PM Narendra Modi and Saif Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 2:16 PM

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या जनशताब्दीनिमित्त कपूर कुटुंबीयांनी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचं खास आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. नीतू कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर सहानी, सैफ अली खान हे सर्वजण मोदींना भेटले. राज कपूर यांच्या चित्रपटांचा वारसा साजरा करण्यासाठी आरके फिल्म्स, फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया यांनी राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्यासाठी कपूर कुटुंबीय दिल्लीला गेले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने मोदींसोबतच्या भेटीदरम्यान काय काय बोलणं झालं, याचा खुलासा केला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “संसदेतील कामकाजानंतर ते आम्हाला भेटायला आले होते. त्यामुळे ते जरा दमलेले असतील असा माझा अंदाज होता. पण आम्हा सर्वांना पाहताच त्यांनी स्मितहास्य केलं आणि आम्हा सर्वांशी ते खूप चांगल्याप्रकारे बोलले. करीना, करिश्मा आणि रणबीर यांच्या माध्यमातून मी त्यांना भेटू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. कपूर कुटुंबीयांसाठी ही खूप मोठी सन्मानाची बाब आहे.”

हे सुद्धा वाचा

“भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी माझ्या पालकांविषयी वैयक्तिकरित्या विचारलं. तुम्ही तैमुर आणि जहांगीरला भेटायला घेऊन याल असं मला वाटलं होतं, असंही ते मला म्हणाले. नंतर करीनाने तैमुर आणि जेहसाठी एका कागदावर त्यांचा ऑटोग्राफ घेतला. तोसुद्धा त्यांनी अत्यंत प्रेमळपणे दिला. ते आपला देश चालवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. त्यातूनही ते लोकांच्या भेटीगाठीसाठी वेळ आवर्जून काढतात. मी त्यांना विचारलं की त्यांना आराम करायला किती वेळ मिळतो. त्यावर ते म्हणाले की रात्री तीन तास झोपायला मिळतात. माझ्यासाठी तो दिवस खूप खास होता. आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाला इतका मान-सन्मान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले”, असं त्याने पुढे सांगितलं.

राज कपूर यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त 13 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचसोबत राज कपूर यांचे काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.