Elvish Yadav पोलिसांच्या ताब्यात, चौकशीनंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Elvish Yadav : रेव्ह पार्टी, सापाचं विष, पार्टीत परदेशी मुली... वादाच्या भोवऱ्यात अडकलेला एल्विश यादव अखेर पोलिसांच्या ताब्यात.. चौकशीनंतर मात्र...; सध्या सर्वत्र एल्विश यादव याची चर्चा... गंभीर प्रकरणात अडकल्यानंतर होणार त्याच्या कामावर परिणाम?
मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याचं नाव नोएडा याठिकाणी झालेल्या रेव्ह पार्टीत आल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रेव्ह पार्टीत सापांच्या विषाची तस्करी केल्यामुळे एल्विश यादव अडचणीत अडकला आहे. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पाच जणांना अटक केल्यानंतर पोलीस तीन राज्यांमध्ये एल्विश यादव याचा तपास करते होते. एवढंच नाही तर भाजप नेत्या मेनका गांधी यांनी देखील एल्विश याला अटक करण्याची मागणी केली होती. आता समोर येत असलेल्या माहितीनूसार राजस्थान मधील कोटा येथून एल्विश याला ताब्यत घेतलं आहे. पण चौकशी केल्यानंतर एल्विश याला सोडण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एल्विश यादवला पोलिसांनी कोटा-झालावार हायवेवर ताब्यात घेतलं. कोटा ग्रामीण पोलीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करत तपासणी करत होते. यावेळी दुसऱ्या राज्यातून आलेल्या गाड्यांची चौकशी सुरु होती. याच दरम्यान, एल्विश याची कार आली. एल्विश याच्यासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या. याच पोलिसांनी एल्विश याच्या गाडीला थांबवलं आणि सर्व कागदपत्रांची चौकशी केली आणि त्याला सोडून दिलं.
रिपोर्टनुसार, एल्विश याची कोटा ग्रामीण पोलिसांनी सुमारे 20 मिनिटांपर्यंत आडवलं होतं. याचदरम्यान एल्विश याची चौकशी करण्यात आली. मुंबईहून दिल्ली याठिकाणी मित्रांसोबत जात आहे.. अशी एल्विश याने पोलिसांना माहिती दिली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एल्विश यादव याची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एल्विश यादवला कोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नोएडा पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. यावेळी पोलिसांनी तो गुन्हेगार नसल्याचे सांगत त्याला अटक करण्यास नकार दिला. यानंतर एल्विश यादवची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
रेव्हा पार्टीमध्ये एल्विश याचं नाव समोर आल्यानंतर त्याला अटक होणार की नाही? अशी चर्चा रंगत होती. पण आता एल्विश याची चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधीत प्रकरणाचा एल्विशच्या कामावर होईल परिणाम
रेव्ह पार्टी, सापाचं विष, पार्टीत परदेशी मुली… या प्रकरणामुळे एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवाय प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यामुळे एल्विशच्या कामावर परिणाम होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रसिद्धी झोतात आल्यामुळे एल्विशकडे अनेक रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओंच्या ऑफर्सही आहेत. पण एल्विश बेपत्ता असल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो… अशी दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.