VIDEO : तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ भडकल्या, उर्फी जावेद विरोधात पोलिसात तक्रार, नेमकं काय घडलं? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
उर्फी जावेदविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. याविरोधात आता उर्फी जावेदही आक्रमक झालीय.
मुंबई : तोकड्या कपड्यांवरुन प्रकाशझोतात आलेल्या उर्फी जावेदविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झालाय. उर्फी जावेदविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. याविरोधात आता उर्फी जावेदही आक्रमक झालीय. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. पोलिसात तक्रार दिल्यानंतर आता जिथं दिसेल तिथं थोबाड रंगवणार, असा इशारा उर्फी जावेदला चित्रा वाघांनी दिलाय.
चित्रा वाघांच्या या इशाऱ्यावर उर्फी जावेदनं निशाणा साधलाय. राजकारण्यांना त्यांची कामं नाहीत का? मला कोणीही जेलमध्ये पाठवू शकत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी सारं सुरुय. माझ्यावर टीकेऐवजी अवैध डान्सबार आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसाय थांबवण्यासाठी कामं करा, असं उर्फी जावेदनं म्हटलंय.
याशिवाय तोकड्या कपड्यांवरची उर्फी जावेदची भूमिका काय? यासाठी तिचे काही जुने व्हिडीओही व्हायरल होतायत.
24 वर्षीय उर्फी जावेद मूळ उत्तर प्रदेशातल्या लखनौतली आहे. तिनं काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर बिगबॉसमध्ये सहभागानंतर ती प्रसिद्धीला आली. आणि सध्या उर्फी जावेदही सोशल मीडियातल्या तिच्या अंगप्रदर्शनामुळे वादात राहते.
पठाण सिनेमातल्या अंगप्रदर्शनावरुन दिपीका पदूकोनविरोधात हिंदू संघटना आक्रमक आहेत. आणि आता उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मोर्चा उघडलाय. त्यामुळे उर्फी जावेदला अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.