गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर..
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर अवघ्या काही तासांमध्ये लोकांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात हैराण करणारे खुलासे होताना दिसत आहेत.
बाॅलिवूड स्टार सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. लॉरेन्स बिश्नोई हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसत आहे. आता तर थेट मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई याने घेतली. गोळीबाराच्या अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. गुजरातच्या भुजमधून आरोपींना ताब्यात घेतले.
आता या गोळीबार प्रकरणातील तिसऱ्या आरोपींला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळत आहे. हेच नाही तर या गोळीबाराच्या अगोदर आणि नंतरही हा व्यक्ती हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या व्यक्तीला हरियाणा येथून अटक केलीये. हेच नाही तर गुजरातला या हल्लेखोरांनी सीमकार्ड देखील बदलले.
हल्लेखोरांच्या फोनवर एकाच नंबरवरून सतत फोन येत होता आणि हल्लेखोर देखील एकाच नंबरवर फोन करत होते. पोलिसांना लोकेशनची माहिती मिळू नये, याकरिता हे हल्लेखोर आपला मोबाईल सतत बंद करत होते. असेही सांगितले जातंय की, अनमोल बिश्नोई हा देखील हल्लेखोरांच्या संपर्कात होता. सतत पोलिसांकडून या प्रकरणात कारवाई केली जातंय.
हल्लेखोरांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे देखील केली जाऊ शकतात. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्याची प्लॅनिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचे देखील सांगितले जाते. हेच नाही तर हे हल्लेखोर काही महिन्यांपासून मुंबईमध्येच राहत होते. दोन्ही हल्लेखोर बिहारमधील आहेत.
या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान आणि गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. सलमान खानची संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांनी घेतलीये. सलमान खान याने आपल्या कामास सुरूवात देखील केलीये. सलमान खानच्या वडिलांना एका मुलाखतीमध्ये या सर्व घटनेचा संताप व्यक्त केलाय. या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.