प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कार्यक्रमातील धांगडधिंगा अंगाशी; 200 जणांविरोधात गुन्हे दाखल; आता मारा कोर्टाचे खेटे
नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केलीये. हेच नाही तर या प्रकरणात थेट पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलिस कर्मचारी हे गंभीर झाले. आता पोलिसांकडून मोठी कारवाई केली जातंय.
मुंबई : नुकताच एक हैराण करणारा प्रकार घडलाय. चक्क अभिनेत्रीच्या कार्यक्रमात धांगडधिंगा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आता या प्रकारानंतर पोलिस हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. हे प्रकरण धिंगाना घालणाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांनी आता या प्रकरणात तब्बल 200 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला सुखरूप बाहेर काढत गाडीमध्ये बसून दिले आणि रवाना केले.
हा धक्कादायक प्रकार बिहारच्या औरंगाबादमध्ये घडलाय. अभिनेत्री अक्षरा सिंग ही एका दुकानाच्या उद्धाटनासाठी बिहारच्या औरंगाबादमध्ये पोहचली. यावेळी अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. अभिनेत्रीला उद्धाटन स्थळी पोहचणे देखील अवघड झाले. उद्धाटन स्थळी अभिनेत्री पोहचली खरी मात्र, तिथून अभिनेत्रीला सुखरूप बाहेर काढणे पोलिसांसाठी मोठे आवाहन ठरले.
अभिनेत्रीला पाहून काही लोक हे धिंगाना घालताना दिसले. यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. मग काय उपस्थित चाहते अधिकच संतापले आणि त्यांनी थेट पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी हे जखमी देखील झाले.
आता या प्रकारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केलीये. धांगडधिंगा आता काही लोकांच्या अंगाशी आल्याचे बघायला मिळतंय. थेट 200 जणांविरोधात गुन्हे हे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेत. अजूनही काही लोकांवर गुन्हे हे दाखल होऊ शकतात. आता हे प्रकरण चांगलेच वाढताना दिसतंय.
अक्षरा सिंग हिच्या कार्यक्रमात धिंगाना घालणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे चांगलेच महागात काहींना पडले आहे. इतकेच नाही तर या कार्यक्रमाला काही राजकिय लोक देखील उपस्थित होते. राजकिय लोकांनी देखील गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी आणि शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, अक्षरा सिंगला पाहण्यासाठी लोक धिंगाना करताना दिसले.
या प्रकरणामध्ये अक्षरा सिंगला गर्दीतून व्यवस्थित बाहेर पोलिसांनी काढले. अक्षरा सिंगच्या जवळ येऊन लोक फोटो घेत होते आणि धिंगाना घालत होते. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आता या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.