Poonam Pandey : भारत वर्ल्डकप जिंकला तर मी कपडे… पूनम पांडे हिच्या वादग्रस्त विधानाने वादळ उठलं होतं…
पूनम पांडे आणि वाद हे जुनं नातं आहे. तिच्या बेताल वक्तव्यांमुळे ती बरेच वेळा चर्चेत आली आहे. तिची सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी तर 2011 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान झाली होती.
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनामुळे एकच खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. सर्व्हिकल ( गर्भाशयाच्या) कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. एवढ्या तरूण वयातच तिच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आली असून इंटस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे.
पूनम पांडे ही केवळ प्रसिद्ध अभिनेत्रीच नव्हे तर मॉडेल म्हणूनही ती खूप प्रसिद्ध होती. काही काळापूर्वीच ती कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ या शोमध्ये झळकली होती. 11मार्च 1991 साली तिचा जन्म दिल्लीत झाला. 2013 साली ‘नशा’ या चित्रपटातून पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानतंर ती हिंदी आणि तेलगु चित्रपटांमध्ये झळकली. अनेक बोल्ड सीन्सही तिने दिले, मात्र तिला फार यश मिळालं नाही. मात्र चित्रपटांमध्ये तिची कारकीर्द फारशी गाजली नाही. हिंदी फिल्म इंटस्ट्रीमध्ये पूनम तिच्या कामापेक्षा तिच्या बेताल वक्तव्यांमुळेच जास्त गाजली. तिच्या बोल्ड आणि हॉट लूकसाठी देखील ती बरीच प्रसिद्ध होती. तिने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते.
वादाशी जुनं नातं
पूनम पांडे आणि वाद हे जुनं नातं आहे. तिच्या बेताल वक्तव्यांमुळे ती बरेच वेळा चर्चेत आली आहे. तिची सर्वात मोठी कॉन्ट्रोव्हर्सी तर 2011 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान झाली होती. ‘भारताने ( वर्ल्डकपचा) अंतिम सामना जिंकला, तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं.’ तिच्या या वक्तव्याची खूप चर्चा झाली, त्यावरून बराच गदारोळही माजला होता, लोकांनी सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोलही केलं होतं.
त्यानंतरही तिची अशी वक्तव्यं सुरूच होती. यानंतर, 2012 मध्ये, अभिनेता शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्ससाठी चीअर करतानाही तिने असेच बेताल वक्तव्य केलं. केआरके संघ जर यावर्षी आयपीएल ट्ऱॉफी जिंकली तर ती प्रेक्षकांसमोर न्यूड होईल, पम नंतर पूनमने तिचा शब्द फिरवला. तिच्या अशा बोल्ड विधानांमुळे पूनम सतत फोकसमध्ये असायची.