Pooja Bhatt | वडील महेश भट्ट यांच्याबद्दल मोठा खुलासा करत पूजा म्हणाली, माझे घर चालवण्यासाठी कोणीच नाही, अभिनेत्रीचे मोठे भाष्य
महेश भट्ट हे नेहमीच चर्चेत असतात. महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे नुकताच पूजा भट्ट ही मोठे खुलासे करताना दिसली आहे. महेश भट्ट यांच्याबद्दल देखील पूजा भट्ट हिने मोठे भाष्य केले आहे.

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) मोठ्या वादात सापडले होते. आकांक्षा पुरी हिने कॅमेऱ्यासमोर थेट लिपलाॅक केल्याने अनेकांनी बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांना देखील टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. इतकेच नाही तर नेटकऱ्यांनी या वादामध्ये थेट सलमान खान (Salman Khan) याला देखील ओढले होते. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक किस केल्याने सलमान खान याने देखील आकांक्षा पुरी हिचा क्लास लावला होता. विकेंडच्या वारमध्ये आकांक्षा पुरी (Akanksha Puri) ही घराच्या बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट ही सहभागी झालीये. पूजा भट्ट धमाकेदार गेम खेळताना घरात दिसत आहे. नुकताच बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. या टास्कमध्ये जेवण करत करत दोन सदस्यांना चर्चा करायची आहे.
यामध्ये घरातील काही गोष्टींवर किंवा आपल्या पर्सनल लाईफबद्दल सांगू शकतो. विशेष म्हणजे या टास्कमध्ये घरातील सदस्यांना विशेष अधिकार देण्यात आला असून जेवण्याच्या टेबलवर कोणाला किती वेळ बसू द्यायचे हे घरातील इतर सदस्य ठरवणार आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले बजर हे वाजवतील. पूजा भट्ट आणि अभिषेक जातात. यावेळी अभिषेक हा घरातील विषयावर चर्चा करताना दिसतो.
पूजा भट्ट म्हणते की, मी माझ्या कुटुंबियांना खूप जास्त मिस करत आहे. पूजा भट्ट पुढे म्हणते की, तुमच्या सर्वांकडे असे कोणीतरी आहे जे तुमची वाट पाहत आहे. मात्र, माझ्याकडे असे कोणीच नाहीये. पूजा पुढे म्हणाली की, मी सिंगल असून माझे घर चालवारे देखील माझ्याकडे कोणीच नाहीये. हे म्हणताना पूजा खूप जास्त निराश दिसत होती.
पूजा म्हणते, मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच माझे वडील महेश भट्ट यांनी प्रचंड मिस करत आहे. मला त्यांची खूप आठवण येत आहे. इतर लोक काय बोलतात हे माझ्यासाठी अजिबातच महत्वाचे नाहीये. मला फक्त माझ्या वडिलांच्या बोलण्याचा फरक पडतो. जेंव्हा माझे वडील म्हणतात तू बरोबर रस्त्याने चालत आहेस, त्यावेळी मी फक्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देते इतरांच्या अजिबातच नाही.