Pooja Bhatt | ‘वडील महेश भट्ट यांनी तुझा शारीरिक वापर केला का?’; ट्रोलरला लेक पूजाचं सडेतोड उत्तर

वडील महेश भट्ट यांच्यावरून अभिनेत्री पूजा भट्टला ट्रोल करणारी आक्षेपार्ह कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूजाने संबंधित ट्रोलरसा सडेतोड उत्तर दिलं आहे. ही पोस्ट नेमकी काय होती, ते जाणून घेऊयात..

Pooja Bhatt | 'वडील महेश भट्ट यांनी तुझा शारीरिक वापर केला का?'; ट्रोलरला लेक पूजाचं सडेतोड उत्तर
Mahesh Bhatt and Pooja BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 8:17 AM

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री पूजा भट्ट गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी 2’ या शोमुळे चर्चेत होती. या शोचं विजेतेपद पटकावण्यात तिला यश मिळालं नाही, मात्र त्यातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सूत्रसंचालक सलमान खाननेही तिच्या खेळीचं कौतुक केलं. पूजा तिच्या दमदार खेळीच्या जोरावर ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. मात्र विजेतेपद जिंकण्यात तिला अपयश मिळालं. आता या शोनंतर ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी ती वडील महेश भट्ट यांच्यावरून ट्रोल केल्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. महेश भट्ट यांच्यामुळे पूजाला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता नुकत्याच एका ट्रोलरने पूजाला वडिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. त्यावर तिने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महेश भट्ट यांच्यावरून पूजाला केलं ट्रोल

पूजाने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला. त्यावर एका युजरने 70 च्या दशकातील अभिनेत्री परवीन बाबीसोबत महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपचा उल्लेख केला. संबंधित ट्रोलरने लिहिलं, ‘तुझे वडील कहाण्या ऐकवत आहेत की परवीन बाबी विवस्त्र होऊ अंधाऱ्या रात्री त्यांच्या मागे धावली होती. तुम्ही हे सुनिश्चित करू शकाल का, की महेश भट्ट यांनी त्यांच्या अहंकाराला संतुष्ट करण्यासाठी कधी तुझा शारीरिक वापर केला नाही. हा अजब विरोधाभास आहे. लोक स्वत:च्या अहंकारासाठी दुसऱ्यांच्या भावनांचा वापर करतात आणि त्यानंतर स्वतंत्रपणे स्वत:ला देवाचा पुत्र म्हणत फिरतात.’

Pooja Bhatt’s reply to a person calling out Mahesh Creepy Bhatt! 💀 by u/vishaw_kalra in BollyBlindsNGossip

हे सुद्धा वाचा

पूजा भट्टचं उत्तर

ट्रोलरच्या या कमेंटवर पूजा भट्टने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुम्हाला त्या आंधळ्या द्वेषापासून वाचवू दे जो तुम्ही पसरवू इच्छित आहात. माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही सर्वांत चांगले व्यक्ती बना.’ पूजाची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘ट्रोलरने आपली मर्यादा ओलांडली’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशा पद्धतीचं ट्रोलिंग थांबवलं पाहिजे किंवा त्याविरोधात योग्य ती कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी दुसऱ्या युजरने केली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.