Pooja Hegde: पूजा हेगडेला इंडिगो विमान कर्मचाऱ्याकडून वाईट वागणूक; ट्विट करत व्यक्त केली नाराजी
मुंबईहून विमानाने प्रवास करताना तिला विमान कर्मचाऱ्याकडून (Flight staff member) वाईट वागणूक मिळाली. याबद्दल तिने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भूमिका साकारणारी अभिनेत्री (Actress) पूजा हेगडे (Pooja Hegde) हिचं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. मुंबईहून विमानाने प्रवास करताना तिला विमान कर्मचाऱ्याकडून (Flight staff member) वाईट वागणूक मिळाली. याबद्दल तिने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘IndiGo6E या विमानाने प्रवास करताना विपुल नकाशे नावाच्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला अत्यंत वाईट वागणूक दिली. तो आमच्याशी विनाकारण उद्धट आणि धमकीच्या स्वरात बोलत होता’, असं ट्विट पूजाने केलंय. तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सेलिब्रिटींनाच अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांशी ते कसं वागतील, असं नेटकरी म्हणाले.
‘अशा समस्यांबद्दल मी सहसा ट्विट करत नाही, पण हे खरंच वाईट होतं’, असंही तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटवर काही युजर्सनी त्यांना आलेला अनुभवसुद्धा सांगितला आहे. ‘कालच मी या एअरलाइन्सचं तिकिट बुक केलं होतं, मात्र आता तुमचं ट्विट पाहिल्यानंतर मी ते रद्द करत आहे’, असंही एकाने म्हटलं. पूजाच्या या ट्विटवर अद्याप इंडिगो एअरलाइन्सकडून कोणतंही स्पष्टीकरण किंवा उत्तर देण्यात आलेलं नाही.
Extremely sad with how rude @IndiGo6E staff member, by the name of Vipul Nakashe behaved with us today on our flight out from Mumbai.Absolutely arrogant, ignorant and threatening tone used with us for no reason.Normally I don’t tweet abt these issues, but this was truly appalling
— Pooja Hegde (@hegdepooja) June 9, 2022
पूजाने ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने हृतिक रोशनसोबत भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळाली. पूजा सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पहिल्या पाच अभिनेत्रींपैकी एक आहे. पाच वर्षांनंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. आगामी ‘सर्कस’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.