Pooja Hegde लवकरच ‘या’ क्रिकेटरसोबत अडकणार विवाहबंधनात! काय आहे सत्य!
Pooja Hegde | अभिनेता सलमान खान याच्यासोबत डेटिंगच्या अफवांना पूर्णविराम, पूजा हेगडे लवकरच 'या' क्रिकेटरसोबत करणार लग्न? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हेगडे हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... नक्की काय आहे सत्य, पूजा खरंच करणार क्रिकेटरसोबत लग्न?
मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री पूजा हेगडे हिने फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. आज पूजा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पूजा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील पूजा हिच्या चाहच्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यासंबंधी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. दरम्यान, पूजा हेगडे हिचं नाव अभिनेता सलमान खान याच्यासोबत जोडण्यात आलं होतं. पण रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं स्पष्टीकरण अभिनेत्री दिलं…
सलमान खान याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर, अभिनेत्री एका क्रिकेटरसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार, पूजा मुंबई स्थित एका क्रिकेटरसोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर पूजा हिने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा पूजा हिच्या नावाची क्रिकेटरच्या नावासोबत चर्चा होत आहे. याआधी देखील पूजा कर्नाटक येथील एका क्रिकेटरसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या भावाच्या लग्नात देखील क्रिकेटर उपस्थित होता… पण नंतर अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही.. असं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.
पूजा हेगडे हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ आणि ‘जन गण मन’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत देखील अभिनेत्रीने स्किन शेअर केली. ‘मोहनजो दारो’ सिनेमात अभिनेत्रीने हृतिक याच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.
‘मोहनजो दारो’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली नाही. पण पूजा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील अभिनेत्रीने ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. पूजा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. पूजा हेगडे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.