Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ? कुठे, कोणत्या रुग्णालयात झालं निधन? प्रश्नांवर सर्वांचंच मौन

अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 1 फेब्रुवारी रोजी पूनमचं सर्वाइकल कॅन्सरने निधन झालं. तिच्या टीमकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पूनम विविध कॉन्ट्रोव्हर्सीमुळे सतत चर्चेत होती.

पूनम पांडेच्या मृत्यूचं गूढ? कुठे, कोणत्या रुग्णालयात झालं निधन? प्रश्नांवर सर्वांचंच मौन
पूनम पांडेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 3:26 PM

मुंबई : 2 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वाइकल कॅन्सरने तिचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. पूनमच्या पीआर टीमकडून, मॅनेजरकडून तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे. मात्र तरीही अद्याप पूनमचं निधन कोणत्या रुग्णालयात, कधी झालं यांसारख्या प्रश्नांबाबत अद्याप सर्वांनीच मौन बाळगलं आहे. तिच्या मृत्यूसंदर्भात काही प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. शिवाय तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहित तिच्या निधनाविषयीची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला हे सांगताना अतीव दु:ख होत आहे की सर्वाइकल कॅन्सरमुळे आम्ही पूनम पांडेला गमावलं आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ती प्रेमाने भेटली. या दु:खाच्या क्षणी तुम्ही आमच्या खासगी आयुष्याचा आदर कराल, अशी अपेक्षा आहे.’ ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र हा एखादा पब्लिसिटी स्टंट किंवा अकाऊंट हॅकचं प्रकरण असावं असं अनेकांना वाटलं होतं. अखेर त्यांच्या टीमने पूनमच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र त्यांनी तिच्या मृत्यूसंदर्भात अधिक कोणतीच माहिती दिली नाही. पूनमच्या निधनावरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

निधनाच्या दोन दिवसांपूर्वीचा पूनमचा व्हिडीओ

पूनमच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित

  • पूनमचं निधन कधी झालं?
  • कोणत्या रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला?
  • तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार?
  • कुटुंबीयांनी कोणती प्रतिक्रिया दिली?

असे काही प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. तिच्या टीमपासून कुटुंबीयांपर्यंत सर्वांनीच या प्रश्नावर मौन बाळगलं आहे. यादरम्यान प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्माच्या एका पोस्टनेही आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहितने त्याच्या पोस्टद्वारे सांगितलंय की दोन दिवसांपूर्वीत मुंबईत त्याने पूनमसोबत एका शूटिंगसाठी काम केलं होतं. त्यामुळे अचानक असं काही घडावं याची कल्पनासुद्धा त्याने केली नव्हती. एका मुलाखतीला दिलेल्या मुलाखतीत रोहित वर्मा म्हणाला, “दोन दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान पूनम अत्यंत तंदुरुस्त आणि स्वस्थ दिसत होती. तिला कॅन्सर झाला असेल असं किंचितही वाटलं नव्हतं.”

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.