पतीलाही पूनम पांडेच्या निधनावर संशय; काय म्हणाला सॅम बॉम्बे?

Poonam Pandey Husband : पूनम पांडेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला "तुम्ही प्रश्न विचारा कारण..", फक्त 13 दिवसांच्या संसारानंतर पूनम हिने पतीवर केले होते अनेक गंभीर आरोप..., अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ

पतीलाही पूनम पांडेच्या निधनावर संशय; काय म्हणाला सॅम बॉम्बे?
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 12:29 PM

Poonam Pandey Husband : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या निधनाच्या चर्चांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अभिनेत्रीचं निधन झाल्याची बातमी पूनम हिच्या मॅनेजरने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. पूनम हिच्या निधनाबद्दल तिच्या कुटुंबियांनी मौन बाळगलं आहे. दरम्यान, पूनम हिचा पती सॅम बॉम्बे (Sam Bombay) याने पत्नीच्या निधनावर मोठं वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सॅम बॉम्बे याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दुःख व्यक्त करत सॅम बॉम्बे म्हणाला, ‘जी घटना घडली आहे ती पचवणं माझ्यासाठी कठीण आहे. हे सत्य असू शकत नाही… या प्रसंगातून मला पळवाट काढायची नाही… थोड्याच वेळात मी पोस्ट करेल… कृपया पूनमसाठी प्रार्थना करा… मी तुमच्या सहानुभूतीबद्दल सर्वांचे आभार मानतो परंतु आपण सर्वांनी प्रश्न विचारत राहा.. अशी मी विनंती करतो… मला हे काही ठिक वाटत नाही..’ असं देखील अभिनेत्रीचा पती म्हणाला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sam Bombay (@sambombay)

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांचं नातं…

पूनम हिला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. वैवाहिक आयुष्यात देखील पूनम हिला आनंद मिळाला नाही. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘लॉक अप’ शोमध्ये पूनम हिने तिच्या खासगी आयुष्यात घडलेल्या धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या.

पूनम हिने पती विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दाखल केलेल्या तक्रारीत पूनम हिने अनेक धक्कादायक गोष्टी मांडल्या होत्या, पती सॅम बॉम्बे याच्याकडून सतत होणाऱ्या मारहाणीमुळे अभिनेत्री ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. पूनम चार मजल्याच्या इमारतीत पतीसोबत राहत होती. पण पूनम पतीच्या परवानगी शिवाय घरातून बाहेर येऊ शकत नव्हती. सॅम ज्याठिकाणी जायचा तेथेच पूनम जाऊ शकत होती. सध्या अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.