“काम मिळत नव्हतं म्हणून..”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा

आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Pandey) नुकतीच 'लॉक अप' या शोमध्ये हजेरी लावली. या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यात पूनमवर काही आरोप करण्यात आले आहेत.

काम मिळत नव्हतं म्हणून..; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा
पूनम पांडेImage Credit source: Poonam Pandey/Instagram
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 12:47 PM

‘लॉक अप’ (Lock Upp) हा नवा रिअॅलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये विविध सेलिब्रिटी भाग घेत आहेत. निशा रावल, बबिता फोगाट हे काही दिवसांपूर्वी या शोमध्ये आले होते. या शोमध्ये हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींवर काही आरोप केले जातात आणि त्यावर ते स्पष्टीकरण देतात. आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Pandey) नुकतीच या शोमध्ये हजेरी लावली. या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यात पूनमवर काही आरोप करण्यात आले आहेत. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच माहित नसतानादेखील लोक माझ्याबद्दल मतं व्यक्त करतात,” असं म्हणत असताना पूनमने तिने केलेल्या चुकांचीही कबुली दिली. या शोदरम्यान पूनमने धक्कादायक खुलासासुद्धा केला आहे. काम मिळत नव्हतं म्हणून पूनमने कोणती युक्ती लढवली, याबद्दल तिने सांगितलं. (Poonam Pandey on Controveries)

पती सॅम बॉम्बेवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्यामुळे पूनम गेल्या वर्षी चर्चेत आली होती. अलीकडेच तिचं नाव एका पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातही आलं होतं, ज्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचाही समावेश होता. पूनमने राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांवर फसवणूक, चोरी आणि तिचे फोन नंबर लीक केल्याचा आरोप केला होता. ‘लॉक अप’ या शोमध्ये तिच्यावर झालेल्या आरोपांची कबुली देत पूनमने तिची चूक सुधारणार असल्याचंही स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली, “मला काम मिळत नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची खूप गरज होती. काही गोष्टींवर मी डोळे मिटून विश्वास केला. कोणीही मला म्हटलं की एखादी गोष्ट कर किंवा ते केल्याने तुझ्या करिअरला फायदा होईल, तर ते मी आंधणेपणानं करायचे. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे ते निर्णय चुकीचे होते. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत करूनच तुम्ही पुढे येऊ शकता. १५ मिनिटांची प्रसिद्धी ही कधीच महत्त्वाची नसते, हे मला समजलं. यापुढे मी माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करेन. माझ्या कामातून मी स्वत:ला सिद्ध करेन.”

पूनमने २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम पुढे म्हणाली, “त्या चित्रपटानंतर मला जे काही ऑफर्स येत होत्या, माझ्या आजूबाजूचे लोक मला चुकीच्या दिशेने मार्ग दाखवू लागले आणि मी ते ऑफर्स घेऊ नये असं सांगू लागले. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”

संबंधित बातम्या: कुरबुरी सुरुच, मारहाणीनंतर पूनम पांडे रुग्णालयात, नवऱ्याला अटक

संबंधित बातम्या: गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ, मॉडेल पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या: कोण होतीस तू काय झालीस तू! पतीसोबत वादानंतर पूनम पांडे Oops Momentची शिकार, बोल्ड ड्रेसमध्ये लाजिरवाणी अवस्था!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.