प्रसिद्ध अभिनेत्याचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, घरात आढळल्या अनेक धक्कादायक गोष्टी?

'माझा मृत्यू झाला तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही....', बाथटबमध्ये लोकप्रिय अभिनेत्याचा मृत्यू... त्याच्या घरात आढळल्या अनेक खळबळजनक गोष्टी... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा... रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पोलिसांची कसून चौकशी सुरु...

प्रसिद्ध अभिनेत्याचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, घरात आढळल्या अनेक धक्कादायक गोष्टी?
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 2:53 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसतो. शनिवारी देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. बाथटबमध्ये बुडून अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता मॅथ्यू पेरी आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी दुपारी अमेरिकेतील राहत्या घरी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना अभिनेत्याच्या घरात अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या आहेत.

रिपोर्टनुसार, पोलिसांना अभिनेत्याच्या घरातून एन्टी-डिप्रेसेंट, एन्टी-एंग्जाइटी आणि COPD ड्रग्ज आढळले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेत्याच्या घरातून एकही अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आलेला नाही. सीओपीडी हा एक प्रकारचा फुफ्फुसाचा आजार आहे. ज्यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो.

मॅथ्यू पेरी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला धूम्रपान आणि दारूचं देखील व्यसन लागलं होतं. व्यसनातून स्वतःला सावरण्यासाठी अभिनेत्याने मोठा संघर्ष देखील केला होता. पोस्टमॉर्टेममध्ये, पेरी याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या शरीरात काणत्या प्रकारचे ड्रग्ज होते की नाही… याचा तपास पुढे सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

मॅथ्यू पेरी याच्या ड्रग्ज आणि अल्कोहोलचे सेवनाच्या सवयीबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. यावर खुद्द अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं होतं.. २०२२ मध्ये मॅथ्यू स्वतःच्या बायोग्राफीमध्ये म्हणाला होता की, ‘मी व्यसनाच्या आहारी गेलो होतो. मी आज जिवंत आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझा मृत्यू झाला तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही.’

मॅथ्यू पेरी याला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण अभिनेत्याने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. अभिनेत्याचा सहा महिन्यात साखरपुडा मोडला. मॅथ्यू पेरी याला आयुष्यात वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. एवढंच नाही तर, व्यसनातून स्वतःला सावरण्यासाठी अभिनेत्याने तब्बल ९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ७४ कोटी रुपये खर्च केले होते… अशी माहिती देखील समोर येत आहे…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.