Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आलिशान जगणं सोडून राहतेय झोपडीत; मंदिरात गातेय भजन

अभिनेत्रीने निवडला अध्यात्माचा मार्ग; भक्तीत लीन झाल्याचे व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आलिशान जगणं सोडून राहतेय झोपडीत; मंदिरात गातेय भजन
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आलिशान जगणं सोडून राहतेय झोपडीतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 7:35 PM

ग्लॅमरच्या विश्वात येणं जितकं सोपं आहे, तितकंच त्यात टिकणं कठीण आहे. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी पैसा-प्रसिद्धी मिळवल्यानंतर संन्यास घेतला. काही महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेत्री (TV Actress) नुपूर अलंकार (Nupur Alankar) यांनी अभिनयविश्व सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. नुपूर सध्या ग्लॅमरच्या विश्वाला अलविदा करून अध्यात्मात मग्न झाल्या आहेत. त्यांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या मंदिरात देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचताना, गाताना पहायला मिळत आहेत.

मायानगरी मुंबईत अनेक कलाकार त्यांची स्वप्नं घेऊन येतात. त्यापैकी काही जणांची स्वप्नं पूर्ण होतात, तर काहींना इंडस्ट्रीत अपेक्षित यश मिळत नाही. नुपूर यांनीसुद्धा बराच संघर्ष करून टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं होतं. जवळपास 27 वर्षे त्यांनी टेलिव्हिजनवर काम केलं. एवढी वर्षे काम केल्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

आईच्या निधनानंतर सांसारिक मोहमायातून मुक्त झाल्याचं त्यांनी म्हटलं. आता उर्वरित आयुष्य त्यांना देवाच्या भक्तीत व्यतीत करायचं आहे. नुपूर इन्स्टाग्रामवर सक्रिय असून तिथे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. एका व्हिडीओत त्या कृष्णाच्या मंदिरात नाचताना दिसत आहेत.

इन्स्टाग्रामवरील काही फोटोंमध्ये त्या एका झोपडीबाहेर बसून ध्यानसाधना करताना दिसत आहेत. त्यांनी आतापर्यंत शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटियाँ, दिया और बाती हम, राजा जी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मालिकांशिवाय त्यांनी चित्रपटातही काम केलंय.