Adipurush चित्रपटगृहात पाहायला जायच्या विचारात आहात? ‘ही’ महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवाच
'आदिपुरुष' सिनेमाची क्रेझ सध्या चहत्यांमध्ये दिसून येत आहे... पण सुट्टीच्या दिवशी सिनेमा पाहायचा विचार करत असाल तर, 'ही' गोष्ट नक्की लक्षात ठेवा...

मुंबई | मोठ्या प्रतीक्षेनंर अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाता फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहाबाहेर मोठी गर्दी केली. सिनेमाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे… पहिल्या दिवशी सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ज्यामुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे… फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, साऊथमध्ये देखील सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमा हीट ठरला आहे.. सिनेमाच्या पहिल्या दिवसांच्या अकड्यांबद्दल सांगायचं झालं तर, ‘आदिपुरुष’ सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे..
तर इतर भाषांमध्ये देखील सिनेमाने जवळपास ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूणच, प्रभास आणि क्रिती सनॉनच्या सिनेमाने केवळ भारतात १२० ते १४० कोटींची कमाई केली आहे. सुट्टी नसताना देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असल्याचा मोठा फायदा सिनेमाला होवू शकतो.. सिनेमा विकेन्डला तब्बल २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारु शकतो… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा पाहण्याचा विचार करत असाल तर सिनेमा लोकप्रिय ठरतोय ही गोष्ट लक्षात ठेवा…
सिनेमा देशभरात तब्बल ६ हजार २०० पेक्षा अधिक स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.. कोरोना महामारीनंतर आदिपुरुषचे नाव सर्वात मोठी ओपनिंग करणाऱ्या सिनेमांमध्ये सामील झालं आहे. आदिपुरुष हा पठाणनंतर हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमा भारतीय सिनेविश्वातील सर्वात जास्त कमाई कराणारा सिनेमा ठरु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तब्बल ७०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांची ओटीटी प्रदर्शनासाठी देखील डील पक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. तब्बल २५० कोटी रुपयांमध्ये डील मंजूर झाल्याची चर्चा रंगत आहे. सिनेमाने म्यूझीक, सॅटेलाईट आणि सोशल मीडिया राइट्स विकून ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.