मुंबई : साऊथ स्टार प्रभास हा कायमच चर्चेत असतो. प्रभास (Prabhas) याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रभास याचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट (Movie) अत्यंत बिग बजेटचा चित्रपट ठरला. आदिपुरुष चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आदिपुरुष हा चित्रपट फ्लाॅप गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाला विरोध होताना दिसला. लोकांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटातील काही गोष्टींवर आक्षेप घेतला. याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे सांगितले जाते. आदिपुरुष चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना प्रभास हा दिसला. मात्र, चित्रपटाला शेवटपर्यंत काहीच धमाका करण्यात यश मिळाले नाही.
आदिपुरुष चित्रपटानंतर चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रभास याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आता प्रभास याच्या सालार चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीये. मात्र, सालार चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांना मोठा झटका बसलाय. काही दिवसांपूर्वीच सालार चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली होती.
𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐨𝐨𝐝𝐲 𝐒𝐨𝐨𝐧!#SalaarCeaseFire Worldwide Release On Dec 22, 2023.#Salaar #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @hombalefilms #VijayKiragandur @IamJagguBhai @sriyareddy @bhuvangowda84 @RaviBasrur @shivakumarart @vchalapathi_art @anbariv… pic.twitter.com/P3KryJm7Ug
— Salaar (@SalaarTheSaga) September 29, 2023
आता प्रभास याचा सालार हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याची माहिती प्रेक्षकांसोबत शेअर केलीये. आता प्रभास याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो. मात्र, आता यामुळे शाहरुख खान याला मोठा धक्का बसलाय. कारण याच दिवशी शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील रिलीज होतोय.
प्रभास याने एक प्रकारे शाहरुख खान याच्यासोबत पंगा घेतल्याचे दिसतंय. निर्मात्यांनी असा निर्यण का घेतला, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शाहरुख खान याच्या चित्रपटाला फटका साऊथमध्ये बसण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे.