हंगामादरम्यान ‘आदिपुरुष’च्या टीझरला साऊथमध्ये मिळतंय प्रेम; ‘या’ कारणासाठी प्रेक्षकांची पसंती
'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगवर प्रभासने दिली प्रतिक्रिया
प्रभासच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र त्याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगला सुरुवात झाली. चित्रपटातील VFX ची क्वालिटी, राम, रावण, सीता, हनुमान यांचा लूक यावरून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदविला. इतकंच नव्हे तर ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी होऊ लागली आहे. एकीकडे आदिपुरुषच्या टीझरवरून मोठा वाद सुरू असताना दक्षिणेत या चित्रपटासाठी आशेचा किरण पहायला मिळतोय. हैदराबादमध्ये (Hyderabad) नुकताच आदिपुरुषचा 3D टीझर लाँच करण्यात आला.
या टीझर लाँचला प्रभासने हजेरी लावली होती. यावेळी प्रभासने ट्रोलिंगला उत्तरही दिलं आणि त्याचसोबत प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्याचं आश्वासन दिलं. दक्षिणेत आदिपुरुषच्या टीझर लाँचला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
View this post on Instagram
आदिपुरुषचा 3D व्हर्जन टीझर पाहिल्यानंतर प्रभास म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा हा टीझर 3D व्हर्जनमध्ये पाहिला, तेव्हा मी लहान मुलासारखा उत्सुक झालो होतो. तो अनुभव खूपच जबरदस्त होता. हा चित्रपट मोठ्या स्क्रीन्ससाठी बनवण्यात आला आहे आणि खासकरून 3D अनुभवासाठी.” आदिपुरुषचा टीझर 3D मध्ये प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी 60 थिएटर्स तयार केल्याचंही त्याने सांगितलं.
दिग्दर्शक ओम राऊतची प्रतिक्रिया-
‘आम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठी बनवला आहे. त्यातील काही दृश्ये तुम्ही कट करू शकता पण मोबाइल फोनवर पाहण्यासाठी तो चित्रपट नाही. मला पर्याय दिला असता तर मी युट्यूबवर कधीच तो टीझर पब्लिश केला नसता. पण ही काळाची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया ओम राऊतने दिली होती.