Prabhas | प्रचंड ट्रोलिंग, निर्मात्यांवर संताप, ‘आदिपुरुष’वर टीका होत असतानाच विदेशात धमाल करतोय प्रभास

आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच निर्मात्यांच्या निशाण्यावर आहे. मुळात म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चित्रपटाच्या विरोधात पोस्ट शेअर केल्या जात आहेत. लोकांचा संताप वाढताना दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे.

Prabhas | प्रचंड ट्रोलिंग, निर्मात्यांवर संताप, 'आदिपुरुष'वर टीका होत असतानाच विदेशात धमाल करतोय प्रभास
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 2:26 PM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट मोठ्या वादात सापडलाय. मुळात म्हणजे चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद हा सातत्याने बघायला मिळतोय. मात्र, चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर लोकांनी चित्रपटावर टीका करण्यास सुरूवात केलीये. चित्रपटामधील काही डायलॉग्सवर लोकांचा आक्षेप आहे. इतकेच नाही तर माता सीतेच्या लूकवरूनही अनेकांनी निर्मात्यांना टार्गेट करण्यास सुरवात केलीये. सतत आदिपुरुष चित्रपटाचा वाद हा सातत्याने वाढताना दिसतोय. पहिल्या दिवशी चित्रपटाने धमाकेदार कमाई ही बाॅक्स आॅफिसवर (Box office) नक्कीच केलीये. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठा घट बघायला मिळतंय.

आदिपुरुष चित्रपटामध्ये सैफ अली खान याच्या रावणाच्या लूकचीही अनेकांनी थेट खिल्ली उडवली आहे. रावण बघितल्यावर भिती नाही तर हसू येत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या जात आहेत. आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधातील लोकांचा संताप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, लोकांचा वाढलेला संताप पाहता चित्रपट निर्मात्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेत चित्रपटामध्ये काही बदल करणार असल्याचे जाहिर केले आहे. लोकांना ज्या गोष्टीवर आक्षेप आहे, त्यामध्ये बदल केले जाणार आहेत. एकीकडे आदिपुरुष चित्रपटामुळे मोठा वाद सुरू असल्याचे बघायला मिळत आहे तर दुसरीकडे प्रभास हा विदेशात सुट्टया घालवण्यासाठी गेलाय.

आदिपुरुष चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे. प्रभास हा भगवान राम यांची भूमिका साकारताना दिसतोय. आदिपुरुष चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच दुसरीकडे अमेरिकेत धमाल करताना प्रभास हा दिसतोय. एका आठवड्यासाठी प्रभास अमेरिकेत गेलाय. दोन ते तीन दिवसांपूर्वीच प्रभास अमेरिकेत गेल्याची माहिती मिळत आहे. इतका मोठा वाद सुरू असताना प्रभास अमेरिकेत गेल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय.

प्रभास हा नेहमीच चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणि पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेत विदेशात चांगला वेळ घालवण्यासाठी जातो. पुढच्या आठवड्यामध्ये प्रभास हा भारतामध्ये दाखल होईल आणि आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल असे सांगितले जात आहे. प्रभास हा आदिपुरुष चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. आदिपुरुषच्या वादावर अजूनही प्रभास याने काहीच भाष्य केले नाहीये. विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनपासून सैफ अली खान हा दूर होता. तो चित्रपटाचे प्रमोशन करत नव्हता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.