Prabhas : ‘बाहुबली’ फेम प्रभासच्या लग्नाविषयी काकीकडून मोठा खुलासा; म्हणाल्या “तुम्हा सर्वांना आमंत्रित..”

साऊथ सुपरस्टार प्रभास लग्न कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. प्रभासची काकी श्यामला देवी यांना नुकताच त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Prabhas : 'बाहुबली' फेम प्रभासच्या लग्नाविषयी काकीकडून मोठा खुलासा; म्हणाल्या तुम्हा सर्वांना आमंत्रित..
Prabhas
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 12:42 PM

हैदराबाद : 18 ऑक्टोबर 2023 | ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास कधी लग्न करणार, कोणाशी लग्न करणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चाहते फार काळापासून प्रतीक्षा करत आहेत. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटानंतरच प्रभासच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. याआधी त्याचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडलं गेलं आहे. तर ‘आदिपुरुष’ चित्रपटानंतर प्रभासचं नाव क्रिती सनॉनशी जोडलं जात होतं. या लिंक-अप्सच्या चर्चांदरम्यान आता प्रभासच्या लग्नाविषयी त्याची काकी श्यामला देवी यांनी मोठी अपडेट दिली आहे.

प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शेड्युलमधून मोकळा झाल्यानंतर प्रभास लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तो कोणासोबत लग्नबंधनात अडकणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. प्रभासची काकी श्यामला देवी यांना नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा

माध्यमांशी बोलताना श्यामला देवी म्हणाल्या, “आमच्यावर दुर्गम्माचा आशीर्वाद आहे. देव आम्हा सर्वांची खूप चांगली काळजी घेईल. प्रभासचं लग्न नक्कीच होईल आणि तेसुद्धा लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्वांना या लग्नासाठी आमंत्रित करू. हा सोहळा जल्लोषपूर्ण असेल.” प्रभासच्या काकीने त्याच्या लग्नाविषयी ही मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे साऊथ सुपरस्टार लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभासला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. प्रभासने याआधी त्याच्या लग्नाविषयी कधी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र या कार्यक्रमात पहिल्यांदाच त्याने त्यावर मौन सोडलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने लग्नाचं स्थळसुद्धा जाहीर केलं होतं. “मी इथेच तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे”, असं प्रभास त्यावेळी म्हणाला होता. त्याचं हे उत्तर ऐकून चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता.

‘बाहुबली’ फेम प्रभासचं नाव याआधी दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत जोडण्यात आलं होतं. ‘बाहुबली’मधील ही जोडी तुफान चर्चेत होती. मात्र अनुष्काने वेळोवेळी डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत. प्रभास आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, असं तिने स्पष्ट केलं होतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.