प्राजक्ताने हताश चेहऱ्याने बाटली उचलली अन् घटाघटा वाईन प्यायली; असं काय नक्की झालंय काय?
प्राजक्ताच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची चिडचिड झालेली दिसत आहे तसेच तिने थेट वाईनची बॉटल तोंडाला लावली आणि गटागटा वाईन प्यायली. नेमंक काय कारण आहे?

बॉलिवूड सेलिब्रिटी असो किंवा यूट्युबर त्यांचा एखादा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा चर्चा तर होतेच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, यूट्युबर आणि अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता कोळी. प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा तर झालीच पण आता लग्नानंतरचा तिच्या एक व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी तिने तिचा प्रियकर वृषांक खनालसोबत लग्न केलं. लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यानमध्ये ती लग्नानंतरच्या तिच्या आयुष्यावर भाष्य करताना दिसत आहे.
प्राजक्ताच्या नवा व्हिडीओची चर्चा
‘मोस्टलीसेन’ या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या प्राजक्ताने नुकताच एक फनी रील शेअर केला आहे, जो नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे. या रीलमध्ये ती एकदम नवविवाहित स्त्रीच्या भूमिकेत दिसतेय, जी ‘रोमँटिक लाईफ’च्या कल्पनेतून प्रत्यक्षात ‘गेमिंग मॅन’सोबतची रिअॅलिटी फेस करत असल्याचं तिने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्राजक्ता हताश चेहऱ्याने वाईनची बाटली उचलते अन्….
व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्राजक्ता हताश चेहऱ्याने वाईनची बाटली उचलते आणि थेट तोंडाला लावते, तर तिचा नवरा वृषांक शांतपणे सोफ्यावर बसून व्हिडिओ गेम खेळतोय. प्राजक्ता त्याला वाईनचा ग्लास देते आणि स्वतः मात्र संपूर्ण बाटली तोंडाला लावते! त्या व्हिडिओवर तिने कॅप्शनही लिहिले आहे.’लग्न म्हणजे फक्त सूर्यास्ताच्या फोटोंसाठी नसतं’ असं मजेशीर कॅप्शन तिने दिलं आहे.
प्राजक्ताने ‘थू थू थू थू’ असंही कॅप्शन दिलं आहे,
हा व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ताने ‘थू थू थू थू’ असंही कॅप्शन दिलं आहे, ज्याचा अर्थ “नजर लागू नये” असा होतो. यासोबतच तिने ‘वाईट नजर’चा इमोजीही दिला आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीला ‘कभी खुशी कभी गम’ मधलं ‘बोले चूड़ियां’ गाणं चालू आहे, पण हे गाणं गाणारी मुलगी गाताना चक्क भसाड्या आवाजात गाताना ऐकू येत आहे तसेच ती ओरडत गाणे गाताना दिसत आहे. त्यावर प्राजक्ताने मजेशीर रिअॅक्शन देताना दिसत आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओ खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
View this post on Instagram
नवविवाहितांना एक मोठा विनोदी रिअॅलिटी चेक
प्राजक्ता आणि वृषांकची प्री-वेडिंग सेरेमनी 23 फेब्रुवारीला सुरू झाली होती आणि 25 तारखेला दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. या खास प्रसंगी मिथिला पालकर, मल्लिका दुआ, सुशांत दिवगीकर आणि सारांश गोइला यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
वृषांक खनाल हा व्यावसायिकरित्या वकील असून, दोघांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर प्राजक्ताने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करून सगळ्या नवविवाहितांना एक मोठा विनोदी रिअॅलिटी चेक दिला आहे आणि प्रेक्षकांनीही त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलंय.