“आईने मॅट्रिमोनियलमध्ये माझं नाव नोंदवण्याचा उद्योग केला, पण..”; प्राजक्ता माळीने सांगितला लग्नाचा किस्सा

प्राजक्ताने (Prajakta Mali) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. त्याचप्रमाणे ती स्वत: अरेंज मॅरेज करणार की लव्ह मॅरेज करणार, याचंही उत्तर तिने दिलं आहे.

आईने मॅट्रिमोनियलमध्ये माझं नाव नोंदवण्याचा उद्योग केला, पण..; प्राजक्ता माळीने सांगितला लग्नाचा किस्सा
Prajakta MaliImage Credit source: Instagram/ Prajakta Mali
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:40 PM

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ (Luck Down Be Positive) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पहिल्या पोस्टरपासून ते चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणामही आपण पाहिले आहेत. एका जोडप्याचं लग्न होताच लॉकडाउन घोषित होतो आणि लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे एकाच घरात अडकतात. त्यानंतर पुढे काय होतं, हे प्रेक्षकांना अंकुश-प्राजक्ताच्या चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा अत्यंत हटक्या पद्धतीने केलं जात आहे. या प्रमोशननिमित्त प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. त्याचप्रमाणे ती स्वत: अरेंज मॅरेज करणार की लव्ह मॅरेज करणार, याचंही उत्तर तिने दिलं आहे. (Prajakta Mali on Marriage)

काय म्हणाली प्राजक्ता? “मॅट्रिमोनियलमध्ये नाव नोंदवून लग्न करण्याला प्राधान्य देशील की प्रेमविवाह करशील”, असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “आईने आधीच असा उद्योग केला आहे आणि तो साफ तोंडावर आपटलेला आहे. मी तिला खूप आधीपासून बोलत होती की, जर मी लग्न करेन तर मी प्रेमात पडून करेन. कारण मनं जुळली पाहिजेत. हे व्यक्तीसापेक्ष आहे. काहींना तो मार्ग आवडेल तर काहींना माझ्यासारखं प्रेमात पडून लग्न करावंसं वाटेल. मला जी व्यक्ती माहित आहे, ज्याच्याविषयी मला खात्री आहे अशा व्यक्तीशी मी लग्न करेन. मटका म्हणून किंवा जुगार म्हणून मी हे नाही खेळू शकणार. एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्यावर, त्याला ओळखल्यावर मी गोष्टी पुढे नेऊ शकेन. पण मी नक्कीच लव्ह मॅरेजचा पर्याय निवडेन.”

‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार आहेत. तर संजय मोने, प्रिया बेर्डे हे बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. मनोरंजनसृष्टीचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून वयाच्या ८४व्या वर्षी सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची आहे.

संबंधित बातम्या: छगन भुजबळ यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

संबंधित बातम्या: प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

संबंधित बातम्या: अभिनेत्री प्राजक्ता माळी सांगतेय ‘पंच्यगव्य पद्धती’चं महत्त्व, शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.