प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
Madanmanjiri song from Phullwanti: 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता माळीने सादर केली भन्नाट लावणी... बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि घुंगरांच्या आवाजाने चाहते घायाळ, सध्या सर्वत्र नव्या गाण्याची चर्चा...
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ‘फुलवंतीची’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.सिनेमाची टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. प्रदर्शित झालेल्या नव्या गाण्याचं नाव ‘मदनमंजिरी’ असं आहे. ‘मदनमंजिरी’ गाण्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ठेका धरला आहे. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने चाहत्यांना घायळा करायला ‘मदनमंजिरी’ सज्ज झाली आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘फुलवंती’ सिनेमातील मदनमंजिरी गाण्याची चर्चा सुरु आहे. ‘अशी मी – मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी… अशी मी – मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी’ असे गाण्याचे बोल आहेत. प्राजक्ता हिने दमदार नृत्य करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘मदनमंजिरी’ गाण्यची शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. गाणं सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
गाणं आणि प्राजक्ताचा डान्स पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्राजक्ता आणि गष्मिर दोघांसाठीपण सर्वांनी चित्रपट गृहात गेलेच पाहिजे’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा मराठी सिनेसृष्टीतील यंदाच्या वर्षीचा जास्त कमाई करणारा चित्रपट असणार आहेय… जय महाराष्ट्र’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सुंदर सादरीकरण सुंदर नृत्य सुंदर आवाज…’
‘फुलवंतीची’ सिनेमा कधी होणार प्रदर्शित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.