प्राजक्ता माळी पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात? तुम्ही म्हणाल मराठी इंडस्ट्रीत कोणी सापडलाच नाही का?

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या लग्नाची चर्चा तुफान रंगत आहे. आतापर्यंत अभिनेत्री कधीही तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केलेला नाही, पण आता प्राजक्ता जे काही म्हणाली ते थक्क करणारं होतं...

प्राजक्ता माळी पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात? तुम्ही म्हणाल मराठी इंडस्ट्रीत कोणी सापडलाच नाही का?
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:37 AM

prajakta mali : ‘रानबाजार’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी विरोध केला, अनेकांनी मात्र अभिनेत्रीची कौतुकाने पाठ थोपटली. आता देखील प्राजक्ता एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच प्राजक्ता माळी आणि ऋतुजा बागवे यांनी प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या ओटीटी शोमध्ये हजेरी लावली. शोमध्ये दोघींनी धम्माल मस्ती केली. शिवाय प्राजक्ताला तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावर प्राजक्ताने देखील बिनधास्त उत्तरं दिली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. (prajakta mali marriage)

प्राजक्त हिला ‘तू पुढच्या वर्षी लग्न करणार आहेस का?’ असा प्रश्न विचारला. यावर प्राजक्ता म्हणाली, ‘अशी चर्चा गेल्या वर्षापासून सुरु आहे…’ प्राजक्ताच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री अद्याप लग्नबंधनात अडकणार नसल्याचं कळत आहे. एवढंच नाही तर, यावेळी अभिनेत्रीने तिच्या क्रशबद्दल देखील चाहत्यांना सांगितलं आहे. (prajakta mali crush)

अख्ख्या महाराष्ट्राची जी क्रश आहे, तिचा क्रश कोण? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘साऊथ इंडियन सुपरस्टार आहेत, ते माझे पटकन क्रश होतात. पण कोणीही असला तरी त्याला शेवटी मराठीच बनवायचा…’ असं देखील यावेशी प्राजक्ता म्हणाली. सध्या सर्वत्र प्राजक्ताच्या या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

प्लॅनेट मराठीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, प्राजक्ता आणि ऋतुजा यांच्या रंगलेल्या गप्पा चाहत्यांना प्रचंड आवडल्या आहेत. व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता आणि ऋतुजा यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. (prajakta mali photo)

‘रानबाजार’ सीरिजमध्ये प्राजक्ताची भूमिका ‘रानबाजार’ सीरिजमध्ये प्राजक्ताने रत्ना ही व्यक्तीरेखा साकारली होती. अशात रत्नी ही भूमिका साकारताना तू गुटखा खायचीस का? असा प्रश्न विचारण्यात आला. पण यावर प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं होतं. रत्नी ही भूमिका साकारताना अभिनेत्री गुटखा नाही तर त्या पुडीत बडीशेप असल्याचं खुद्द प्राजक्ता हिने सांगितलं होतं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.