प्राजक्ता माळीने दिली ‘गुड न्यूज’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “आयुष्यात छान गोष्ट घडली”

प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच काहीनाकाही शेअर करत असते. आताही प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसोबत एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे. त्या व्हिडीओमध्ये तिने ती आनंदाची बातमी काय आहे याबद्दल सांगितले आहे. तसेच ती व्हिडीओ शेअर करत असही म्हणाली की "आयुष्यात छान गोष्ट घडली".

प्राजक्ता माळीने दिली 'गुड न्यूज'; व्हिडीओ शेअर करत म्हणाली आयुष्यात छान गोष्ट घडली
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 1:27 PM

प्राजक्ता माळी ‘फुलवंती’ चित्रपटानंतर जास्तच चर्चेत आली आहे. तिने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत नक्कीच दिसून आली. प्रेक्षकांनीही तिच्या या चित्रपटाला चांगलीच पसंती दिलेली पाहायला मिळाली. आता प्राजक्ताने आणखी एक गुड न्यूज दिली आहे.

प्राजक्ताचा फुलवंती हा मराठी चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि यामुळे मराठमोळी लोकप्रिय कलाकार आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही गेल्या दोन महिन्यापासून जास्त चर्चेत आली. प्रेक्षकांना फुलवंतीचा डान्सही प्रचंड आवडला.

तिचे नृत्याप्रतीचे पॅशन तसेच तिच्या स्वप्नातली भूमिका म्हणजेच फुलवंती साकारण्यासाठी तिने घेतलेले कष्ट आणि मेहनत सुद्धा पाहायला मिळाली.अशातच प्राजक्ताने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे.

दरम्यान चित्रपटगृह गाजवल्यानंतर फुलवंती हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? याबद्दल सर्वांनाच आतूरता होती. अखेर प्राजक्ताने निर्मिती केलेला फुलवंती चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकीट काढून पाहता येत होता, असं असताना देखील या चित्रपटाने संपूर्ण भारतात सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

हॉलिवूडचे चित्रपट तिथे असताना फुलवंतीला जास्त व्ह्यूज मिळाले, अशी माहिती प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये दिली आहे. फुलवतींने हा बनवलेला नवीन रेकॉर्ड खरोखरच कौतुकास्पद असून प्राजक्ताने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.

या मराठी चित्रपटाने चक्क हॉलिवूड सिनेमालाही मागे टाकत रेकॉर्ड रचला आहे. प्राजक्ताने ही बातमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन प्रेक्षकांचे आभारही मानले. हॉलिवूडच्या चित्रपटांसमोर आपल्या मराठी चित्रपटाने मोडलेला रेकॉर्ड आणि त्याची पसंती पाहाता या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

8 नोव्हेंबर पासून अमेझॉन प्राईमवर उपलब्ध झालेला चित्रपट आता मात्र 22 नोव्हेंबर पासून कोणत्याही सबस्क्रिप्शन शिवाय म्हणजेच ऑनलाइन तिकिटाशिवाय ज्यांच्याकडे प्राईम व्हिडिओचे सबस्क्रीप्शन आहे त्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्की पहावा असे आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून प्राजक्ताने केले आहे.

चित्रपटात प्राजक्तासोबत गश्मीर महाजनही मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारही आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे, चित्रपटाचे संगीत असो किंवा प्राजक्ताच्या लावणीच्या ठसकेबाज अदा असो.

तसेच गश्मीर महाजनीचा अभिनय सर्वांबद्दलच प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. बरं यात अजून एक म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणेज प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. त्यामुळे प्राजक्ताची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी नक्कीच आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.