Prajkta Mali : लग्न? प्राजक्ता माळीची ‘त्या’ कागदपत्रांवर सही, चर्चांना उधाण; अभिनेत्री म्हणाली..
मराठमोळी प्राजक्ता माळी ही सदैव चर्चेत असते. अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिज मध्ये काम करणाऱ्या प्राजक्ताने चाहत्यांच्या हृदयात स्थआन मिळवले असून सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स असतात. प्राजक्ताही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्याचे अपडेट्स, फोटो शूट्स शेअर करते.
मराठमोळी प्राजक्ता माळी ही सदैव चर्चेत असते. अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिज मध्ये काम करणाऱ्या प्राजक्ताने चाहत्यांच्या हृदयात स्थआन मिळवले असून सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स असतात. प्राजक्ताही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्याचे अपडेट्स, फोटो शूट्स यासोबतच प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही महत्वाची गोष्टीही चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. यावेळीही प्राजक्ताने तिच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम वर एक महत्वाची पोस्ट शेअर केली असून चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
या पोस्टमध्ये प्राजक्ता सुहास्य मुद्रेने काही कागदपत्रांवर सही करताना दिसत्ये. तिच्या शेजारी तिची आईदेखील बसली आहे. या फोटोसह प्राजक्ताने एक खास कॅप्शन लिहीली आहे. ’27 एप्रिल 2024 रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित अशा डॉक्युमेंटवर सही केली. ( हे मॅरेज रजिस्ट्रेशन नाही, अजिबात नाही.)’ असं तिने लिहीलं आहे. या क्षणी माझं हृदय कृतज्ञतेने भरलं आहे, असं लिहीत प्राजक्ताने तिचा आनंद व्यक्त केला.
प्राजक्ता माळी हिला तिच्या लग्नाबाबत बऱ्याचदा विचारणा करण्यात येते, त्यामुळे या पोस्टमध्ये तिने गमतीने उल्लेख करत लग्नाचे रजिस्ट्रेशन केले नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. प्राजक्ताने नवं घर घेतलं का अशी चर्चाही या पोस्टमुळे सुरू झाली. तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या. ‘आणखी १० वर्षांचं हास्यजत्रेचं कॉन्ट्रॅक्ट झालं असावं’ असं एकाने लिहीलं तर हे नक्कीच घर आहे, असा विश्वासही चाहत्यांनी व्यक्त केला.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसते.