थाळी, घंटा कोणी वाजवण्यास सांगितलं? नाना पाटेकरांच्या डायलॉगवर ‘जयकांत शिक्रे’चा सवाल

द वॅक्सिन वॉर या विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटातील एका डायलॉगवर अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. चित्रपटातील नाना पाटेकरांच्या एका डायलॉगवरून त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.

थाळी, घंटा कोणी वाजवण्यास सांगितलं? नाना पाटेकरांच्या डायलॉगवर 'जयकांत शिक्रे'चा सवाल
Nana Patekar and Prakash RajImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 9:31 AM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही. या चित्रपटात कोविड महामारीच्या काळातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्याचसोबत कोविड-19 प्रतिबंधक लस बनवण्यासाठी डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय शास्त्रज्ञांशी बोलताना दिसत आहेत. “फक्त विज्ञानानेच कोरोनाला हरवलं जाऊ शकतं”, असं ते म्हणतात. हा व्हिडीओ शेअर करत आता ‘सिंघम’ फेम अभिनेते प्रकाश राज यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

प्रकाश राज यांचा मोदींना टोला

आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी चित्रपटातील एक क्लिप शेअर करत ट्विटरवर लिहिलं होतं की, ‘फक्त विज्ञानाच्या जोरावरच ही लढाई जिंकली जाऊ शकते, असं पंतप्रधान म्हणाले.’ या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी हे चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेत आहेत. एकमेकांसोबत चर्चा करताना ते म्हणतात की, “पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की हे युद्ध आपण फक्त विज्ञानाच्या जोरावरच जिंकू शकतो. तुमच्याकडे बरेच लोक बऱ्याचशा गोष्टी घेऊन येतील, मात्र तुमचे सर्व निर्णय हे फक्त विज्ञानावर आधारित असले पाहिजेत.” अमित मालविय यांच्या ट्विटवर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘सिंघम’ फेम अभिनेता ट्रोल

‘हे फक्त चित्रपटात दाखवण्यापुरती आहे सर. पण खऱ्या आयुष्यात आम्हाला कोणी घंटा आणि थाळ्या वाजवण्यास सांगितलं होतं? गो कोरोना गो हे गाणं कोणी गायला लावलं?’, असं प्रकाश राज यांनी लिहिलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या ट्विटवरून काहींनी त्यांना ट्रोलसुद्धा केलं आहे. ‘ज्या देशाच्या थाळीत खातात, त्यातच छेद करतात’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे खऱ्या आयुष्यातसुद्धा खलनायकच आहेत’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन यांच्या भूमिका आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.