‘जो नडला त्याला मी फोडला…’; शत्रूंच्या मनात दहशत निर्माण करणारा ‘सुर्या’
ॲक्शन, रोमांस, भावना असं भरगच्च पॅकेज असलेला 'सुर्या' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस...
मुंबई : ‘मी कोणाच्या नादी लागत नाही आणि ज्याच्या लागतो तो उरत नाही’ अशी धमकी देत ‘सुर्या’ शत्रूंच्या मनात दहशत निर्माण करताना दिसणार आहे. अभिनेता प्रसाद मंगेश आणि अभिनेत्री रुचिता जाधव स्टारर ‘सुर्या’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सतत नाविन्याचा शोध घेत दरवेळी नवीन प्रयोग करणारी मराठी चित्रपटसृष्टीही ‘सुर्या’ हा नवीन अॅक्शनपॅक्ड सिनेमा प्रेक्षकांसाठी घेवून आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र नवीन मराठी अॅक्शनपॅक्ड सिनेमाची चर्चा रंगली आहे.
सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडल्यानंतर शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात आपलं प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी ‘सुर्या’ नेमकं काय करतो? ‘सुर्या’च्या प्रेमावर आणि कुटुंबाच्या जीवावर उठलेले त्याचे नेमके शत्रू आहेत तरी कोण?शक्ती आणि युक्तीच्याबळावर कोणत्या नीतीचा अवलंब करून ‘सुर्या’त्याच्या शत्रूंना कसं नेस्तनाबूत करणार? या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना सिनेमातून मिळणार आहे.
ॲक्शनसोबत एक सुंदर प्रेम कहाणी प्रेक्षकांना ‘सुर्या’ सिनेमातून अनुभवता येणार आहे. सिनेमात प्रसाद – रुचिकता यांच्यासोबतच हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णु, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, देवशी खांडुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ‘सुर्या’ सिनेमातून अनुभवता येणार आहे, म्हणून धडाकेबाज अॅक्शनसोबत इमोशन्स रोमान्स असं भरगच्च पॅकेज असलेला ‘सुर्या’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. असं म्हणायला हरकत नाही.
‘सुर्या’ सिनेमाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सहनिर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता होती. आज चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सिनेमा आज रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे.